डाऊन सिंड्रोमग्रस्त मुलीवरी यशस्‍वी उपचार

डाऊन सिंड्रोमग्रस्त मुलीवरी यशस्‍वी उपचार

डाऊन सिंड्रोमग्रस्त मुलीवरी यशस्‍वी उपचार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबईतील एका ४ वर्षांच्या मुलीला जन्मजात डाऊन सिंड्रोम असून तिला जन्मजात मोतीबिंदूचे निदान झाले होते. अशा स्थितीत लेन्स जन्मापासूनच ढगाळ असते. ज्यावर उपचार न केल्यास संभाव्य दृष्टी समस्या उद्भवू शकतात. मात्र तिच्‍यावर चेंबूर येथील अग्रवाल नेत्र रुग्णालयात वेळेत उपचार झाल्‍याने तिची प्रकृती आता ठीक आहे.
जन्मजात मोतीबिंदू ही फार दुर्मिळ समस्या आहे. १० हजार मुलांपैकी १ ते ३ मुलांवर याचा परिणाम होतो. डाऊन सिंड्रोमच्या प्रकरणांमध्ये त्यांची संख्या लक्षणीयरीत्या जास्त आहे. या प्रकरणात निदान लवकर होणे आणि योग्य उपचार होणे महत्त्वाचे असते. विशेषतः डाऊन सिंड्रोमच्या संदर्भात, जन्मजात मोतीबिंदूबद्दल जागरूकता आणि समज वाढवणे आवश्यक आहे.
अगरवाल्स नेत्र रुग्णालयाचे प्रमुख- क्लिनिकल सर्व्हिसेस डॉ. निता शहा यांनी सांगितले की, जन्मजात मोतीबिंदूचे सामान्य लोकसंख्येतील प्रमाण तुलनेने कमी आहे. दर १० हजार मुलांपैकी १ ते ३ मुलांमध्ये हा आजार आढळतो. मात्र, डाऊन सिंड्रोमग्रस्त मुलांमध्ये जन्मजात मोतीबिंदूचे प्रचलन बरेच अधिक आहे. दरम्‍यान या मुलीला मोतिबिंदू शस्त्रक्रियेबाबत रुग्णालयातून सल्ला देण्यात आला. तिला सामान्य भूल देऊन इंट्राऑक्युलर लेन्सचे प्रत्यारोपण करण्यात आले. शस्त्रक्रियापूर्व कामांमध्ये तपशीलवार शारीरिक मूल्यमापन व बालरोगतज्ज्ञांची संमती हा महत्त्वाचा भाग होता. शस्त्रक्रियेनंतरही या मुलीच्या शारीरिक स्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यात आले. त्‍यानंतर तिला डिस्चार्ज दिला असून आता तिची प्रकृती ठीक आहे.
....................
आजाराची लक्षणे
पालकांना अनेक मार्गांनी या आजाराबद्दल कळू शकते. सामान्यपणे पालकांना त्यांच्या मुलाची दृष्टी योग्य नाही याच्‍या खुणा कळतात. उदाहरणार्थ, तिरके बघणे, वस्तू ओळखण्यात अडचणी येणे किंवा सामान्यपणे बघताना अस्वस्थपणा जाणवणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com