NAVI MUMBAI
NAVI MUMBAI SAKAL

Navi Mumbai: सहजपणे होतेय गुटखा-तंबाखूची विक्री; नवी मुंबई बनतीये तस्करीचे केंद्र

आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटखा, सुंगधी तंबाखूसारख्या पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. याच अनुषंगाने आठवड्याभरात ३२ ठिकाणांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील शहरात अगदी सहजपणे प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूची विक्री होत असल्याने नवी मुंबई तस्करीचे प्रमुख केंद्र बनल्याचे दिसत आहे.

NAVI MUMBAI
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थांमुळे विविध विकारांना अनेकजण बळी पडतात. त्यामुळे तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवून निरोगी, सुदृढ समाजाच्या निर्मितीसाठी राज्यात हातभट्टीची दारू, गुटखा, मावा आदीच्या विक्रीवर कडक निर्बंध घालण्यात आली आहेत.

मात्र, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे त्याचे काटेकोर पालन होत नसल्याने हा व्यवसाय चालत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. इतर राज्यात गुटखा उत्पादनास बंदी नसल्याने सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधित तंबाखूची तस्करी केली जात आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनानेदेखील अशा विक्रेत्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. यात पनवेल शहरातील पान शॉपींबरोबर कोपरखैरणे, घणसोली, वाशी येथेही छापे मारून हजारो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

NAVI MUMBAI
Navi Mumbai: फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले आजोबा अन् दोघा चोरट्यांनी साधला डाव

पोलिसांसमोर आव्हान
राज्यात तस्करी करून आलेल्या गुटखा, सुगंधित तंबाखूच्या विक्रीतून दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांकडून गुटखा विक्रेते तसेच पुरवठादारांची साखळी खंडित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण पोलिसांना यात अपेक्षित यश मिळाले नसून अजूनही पान टपऱ्यांवर गुटख्याची खरेदी-विक्री सुरुच आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराला गुटखा व अमली पदार्थ मुक्त करण्याचा नारा देणाऱ्या नवी मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

NAVI MUMBAI
Navi Mumbai: मानसिक आणि अभ्यासाचा ताण वाढला म्हणून २ अल्पवयीन मुलांनी उचलले टोकाचे पाऊल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com