गोवरीला पसंती भारी!

गोवरीला पसंती भारी!

संदीप साळवे, जव्हार
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेतीला पूरक ठरणारे पशुपालन हे महत्त्वाची भूमिका बजावते. गाई, म्हशी, बकऱ्या व कोंबड्या सहज या भागात उपलब्ध असल्याने त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नासोबतच शेणापासून गोवऱ्या केल्या जातात. याचा उपयोग पावसाळ्यात सरपणासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. आजही अनेक ठिकाणी गोवरीला भारी पसंती मिळत आहे.

ग्रामीण भागातील चुलीचा धूर कमी करण्यासाठी सिलिंडर अनुदानासारखे विविध उपक्रम केंद्र सरकारकडून सवलतीत सुरू आहेत. मात्र, सध्याच्या वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी, तसेच पावसाळ्यात वापरण्यासाठी लागणाऱ्या इंधनाची पूर्वतयारी म्हणून आदिवासी ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणावर शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जातो. गॅस इंधनाला पर्याय म्हणून नैसर्गिक शेणाच्या गोवऱ्या थापण्याची लगबग सुरू आहे.

गोवऱ्यांची साठवणूक व्यवस्थित करण्यासाठी ग्रामीण भागात मांडव रचण्यास सुरुवात झाली आहे, तर काहींचे हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील महिला वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी गॅसचा वापर कमी करावा लागतो, तसेच त्यासाठी हा चांगला उपाय असल्याने वर्षानुवर्षे शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांकडून त्याची खास काळजी घेण्यात येते. तीव्र उन्हामध्ये ती वाळवण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे पावसाळ्यात लागणाऱ्या इंधनाच्या तयारीसाठी शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या चोरीला जाऊ नयेत आणि पावसाळ्यात भिजू नयेत, यासाठी गोवऱ्या कलवड स्वरूपात ठेवल्या जातात.

आदिवासी समाजाचा पावसाळ्यातील मुख्य आधार मांडव असून त्यासाठी महिला खूप मेहनत घेतात. पावसाचा कितीही जोर असला, तरी मांडवामुळे गोवऱ्याचे रक्षण होते. विशेष प्रकारे वापरून गोवऱ्यासाठी आच्छादन केलेले मांडव हे ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांच्या परिश्रमाचे यशच मानले पाहिजे.
- सारिका निकम, सदस्य, पालघर जिल्हा परिषद

गायी, गुरांच्या शेणापासून आम्ही गोवऱ्या तयार करून थंडी, पावसाळ्यात त्यांचा वापर स्वयंपाकासाठी करून आमचे आरोग्यही अबाधित ठेवतो.
- मोहिनी घाटाळ, शेतकरी महिला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com