‘गोदरेज अँड बॉईज’चा सीएसआर उपक्रम

‘गोदरेज अँड बॉईज’चा सीएसआर उपक्रम

मुंबई, ता. ६ : गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी ‘गोदरेज अँड बॉयस’च्या सीएसआर उपक्रमांमुळे देशातील लाखो लोकांचे जीवनमान उंचावले आहे.
कंपनीने गेल्या दहा वर्षात कौशल्य उपक्रमांवर १८ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याच्या सहापट सामाजिक परतावा मिळाला आहे.

कंपनीने ८८ व्यवसाय प्रशिक्षण संस्थांसाठी २४ राज्य सरकारांशी भागीदारी केली आहे. यात विक्री, सेवा, इमारत बांधकाम, उत्पादन, तांत्रिक प्रशिक्षण, डिजिटल कौशल्य या विषयांवरील विशेष प्रशिक्षण सत्रे घेण्यात आली. यावर भर देणाऱ्या ‘दिशा’ या कार्यक्रमाने गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत सुमारे दोन लाख तरुणांना प्रशिक्षण दिले. त्याखेरीज डिजिटल स्किल प्रोग्राममधील रोबोटिक्स, ऑटोमेशन, बिझनेस अॅनालिटिक्स, डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स या अभ्यासक्रमांमध्येही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आले, अशी माहिती गोदरेज अँड बॉयसच्या सीएसआर प्रमुख अश्विनी देव देशमुख यांनी दिली. गोदरेजने सहा राज्यांमधील २४ गावांमध्ये ग्रामीण समुदायांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कार्यक्रम राबवले. यात शिक्षण आणि आरोग्य तसेच पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, ग्रामीण जीवनमान उंचावणे आणि महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योग बळकट करणे, पाण्याची उपलब्धता वाढवणे यांचा समावेश आहे. यात ४६ शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यात आल्या. महाराष्ट्रात १८ शाळा डिजिटल करण्यात आल्या, त्या आता सौर ऊर्जेवर चालत आहेत.

..
महिला सक्षमीकरणावर भर
गोदरेजने राबवलेल्या पाच हजारांहून अधिक महिलांनी महिला सक्षमीकरण उपक्रमांचा लाभ घेतला. त्यांनी १६०हून अधिक स्वयंसहायता गट तयार करून या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यात आले. याच उपक्रमात दहा कोटी लिटर पाणी साठवून जलसुरक्षा मिळवली गेली. आठ कोटी लिटर क्षमतेच्या तलावांचे पुनरुज्जीवन केले व कोट्यवधी लिटर पावसाचे पाणी साठवणारे बंधारे उभारले. या सर्व उपक्रमांमुळे ग्रामीण नागरिकांचे जीवनमान उंचावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com