विद्यार्थ्यांमध्ये स्टार्ट अप संस्कृतीची बीजपेरणी

विद्यार्थ्यांमध्ये स्टार्ट अप संस्कृतीची बीजपेरणी

मुंबई, ता. ६ : स्टार्ट अप संस्कृतीची बीजपेरणी विद्यार्थ्यांमध्ये करण्यास यशस्वी उद्योजकांशी विद्यार्थ्यांना संवाद साधायला मिळाला तर नवे उद्योजक घडवता येणे शक्य आहे. हा धागा पकडून अरविंद मफतलाल ग्रुपने ‘स्टार्ट मास्टर क्लास’ या उपक्रमाची सुरुवात केली. या माध्यमातून देशातील अग्रगण्य उद्योजकांकडून एक यशस्वी उद्योग कसा उभारावा याचे धडे विद्यार्थी गिरवत आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत अभ्यासक्रमात उद्यमशीलता विकसित करण्याला तसेच कौशल्य विकासाला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. या अंतर्गत अरविंद मफतलाल उद्योगसमूहाच्या ‘गेट सेट लर्न’ या सहयोगी कंपनीने २३ डिसेंबरपासून ‘स्टार्टअप मास्टर क्लास’ हा ऑनलाईन उपक्रम सुरू केला आहे. या नि:शुल्क क्लासच्या माध्यमातून मुंबई, पुण्यासह देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना नामवंत उद्योजकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली आहे.
व्यवसाय सुरू करताना आलेले चढ उतारा याबद्दल आपले अनुभव हे उद्योगपती या विद्यार्थ्यांसोबत शेअर करत आहे. आतापर्यंत या सिरिजमध्ये बेकोचे सह-संस्थापक आदित्य रुईया, मेरिकोचे संचालक ऋषभ मारीवाला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. पुढच्या टप्पात वाईल्ड क्राफ्टचे सिद सूद, अनिश खन्ना तर वेदांतूचे पुलकीत जैन मार्गदर्शन करणार आहे.
….
पालिका शाळांना सहभागी करणार
मास्टर क्लासमध्ये मुंबई, पुणे, बंगळुरुसह देशातील १०० शाळेमधील १५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. पुढच्या टप्प्यात मुंबईतील सर्व स्तरांतील शाळांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे केवळ अग्रगण्य शाळा नव्हे तर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना स्टार्टअपचे धडे गिरवता येणे शक्य होईल, असे कंपनीचे अमित झवेरी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com