थोडक्‍यात रायगड

थोडक्‍यात रायगड

थोडक्‍यात रायगड बातम्‍या
क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
रसायनी, ता. ६ (बातमीदार) : रसायनीतील वासांबे मोहोपाडा येथील ग्रामसुधार मंडळ संचालित जनता विद्यालय मराठी शाळेत वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्‍या. तीन दिवस सुरू असलेल्या कबड्डी, खो खो आदी मैदानी खेळाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळांतर्गत क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन ग्रामसुधार मंडळाचे सचिव तात्यासाहेब म्हसकर आणि कार्याध्यक्ष सुदाम मुंढे यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य देवाजी काळे, पर्यवेक्षक सुधाकर चव्हाण आदी उपस्थित होते. दरम्यान तीन दिवसीय सुरू असलेल्‍या क्रीडा स्पर्धांमध्ये खो-खो आणि कबड्डीच्या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व सामने अटीतटीचे आणि चुरशीचे झाले. दरम्यान कबड्डी खेळात मुलांचा इयत्ता दहावी तुकडी ब आणि मुलींचा इयत्ता दहावीचा तुकडी सी संघ अंतिम विजयी झाला. याशिवाय खो- खो खेळात मुलींचा इयत्ता नववी तुकडी अ तसेच मुलांचा इयत्ता नववीचा तुकडी अ संघ अंतिम विजयी झाला. स्पर्धा आयोजनासाठी क्रीडाशिक्षक चिंतामण ठाकरे, बाबासाहेब फुंदे, साधना मालकर, सविता सपकाळ, मानशी पाटील, सविता मोहिते तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
.......................
माणगावमध्ये पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात
माणगाव, ता. ६ (बातमीदार) ः माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तालुका पत्रकार संघातर्फे उपजिल्हा रुग्णालय येथे शनिवारी ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त औषध व फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. औषध वाटप कार्यक्रम राजिपचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती अँड. राजीव साबळे, माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्याहस्ते तर फळ वाटप कार्यक्रम शिवम कॉम्पुटरचे संचालक भालचंद्र खाडे, उद्योजक खेमचंद मेथा, तरुण मराठी उद्योजक सुभाष दळवी, माणगाव नागरी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष संजय गांधी, यांच्याहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकार संघाच्या कार्याचा गौरव करीत पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला राजिपचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती अँड. राजीव साबळे व माणगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून त्‍यांच्‍या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
..............
चावणे येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळा
रसायनी, ता. ६ (बातमीदार) : रसायनीतील पाताळगंगा परिसरातील चावणे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळा व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता बुधवारी (ता. ३) काल्याच्या कीर्तनाने उत्साहात झाली. सोहळ्यानिमित्त मंदिरात दर दिवस पहाटे काकड आरती आणि भूपाळी, सकाळी सात वाजता ज्ञानेश्वरी पारायण त्यानंतर गाथ्यावरील भजन, चार वाजता पारायण सायंकाळी प्रवचन, हरिपाठ, रात्री कीर्तन नंतर जागर भजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडत होते. तसेच या दरम्‍यान गावात विठ्ठल नामाचा गजर करत दिंडी काढण्यात आली होती. तर यावेळी दीप उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच हभप महादेव महाराज मांडे यांचे काल्याचे कीर्तन झाले. येथील धार्मिक कार्यक्रमांना चावणे पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com