ऐतिहासिक कामे म्‍हणजे पुढे चालणारा वारसा

ऐतिहासिक कामे म्‍हणजे पुढे चालणारा वारसा

ऐतिहासिक कामे म्‍हणजे पुढे चालणारा वारसा
आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रतिपादन; मुख्यमंत्र्यांच्‍या दौऱ्यानिमित्त पत्रकार परिषद
नेरळ, ता. ६ (बातमीदार) ः कर्जत तालुका हा हरित पट्टा आहे. त्यामुळे येथे औद्योगिक क्षेत्र नाही. मात्र पर्यटनाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहरात ऐतिहासिक पाऊलखुणा जपण्यासाठी प्रति आळंदी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक, शिवसृष्टी अशी कामे कर्जतच्या वैभवात भर घालणार आहेत. मात्र ही ऐतिहासिक कामे म्हणजे पुढे चालणारा वारसा असल्याचे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले. कर्जत तालुक्यात ऐतिहासिक कामांचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सात जानेवारी रोजी होणार आहे. या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत बाळासाहेब भवन येथे नुकतेच पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना आमदार थोरवे म्हणाले की, कर्जतमधील ऐतिहासिक कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. यामध्ये कर्जत शहराच्या प्रवेशद्वाराला महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आले आहे. उल्हासनदी किनारी प्रति आळंदी करण्यात आली असून याठिकाणी विठ्ठलाची ५२ फूट उंच मूर्ती उभारण्यात आली आहे. दहिवली चौक येथे धर्मवीर संभाजी महाराज स्मारक, शिवसृष्टी, कर्जत शहरात प्रशासकीय भवन आदी कामांचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान या लोकार्पण सोहळ्यासह भजनसम्राट गजाननबुवा पाटील सभागृह, कर्जत चौक काँक्रिट रस्ता, खोपोली येथे भुयारी गटारे, खालापूर येथे ग्रामीण रुग्णालय, माथेरान येथे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, किरवली जुमपट्टी रस्ता अशी १७२ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन देखील मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडणार असल्याची माहिती थोरवे यांनी दिली. यासह चला घडवूया नंदनवन, कर्जत- खालापूर नंबर एक असे घोषवाक्य देखील त्यांनी जाहीर केले. यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, विधानसभा संपर्कप्रमुख पंकज पाटील, कर्जत पंचायत समिती माजी सभापती मनोहर भोईर, विधानसभा प्रवक्ते अमोल बांदल पाटील आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com