कंगना राणावतची उच्च न्यायालयात धाव

कंगना राणावतची उच्च न्यायालयात धाव

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : गीतकार जावेद अख्तर यांनी कनिष्ठ न्यायालयात आपल्याविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याला स्थगिती द्या, अशी मागणी करत अभिनेत्री कंगना रानौत हिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर ९ जानेवारीला याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

बॉलीवूडमध्ये माफियाराज असल्याचा आरोप कंगनाने केला होता; तसेच अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने गीतकार जावेद अख्तर यांचा उल्लेख एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केला होता. जावेद अख्तर यांनी याप्रकरणी कंगनाविरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला; तर कंगनानेही जावेद अख्तर यांच्याविरोधात गुन्हेगारी कट, खंडणी व इतर आरोप करत तक्रार दाखल केली. अंधेरी न्यायालयाने अख्तर यांच्यावरील खंडणीचा आरोप रद्द करत इतर आरोपाप्रकरणी अख्तर यांना २४ जुलै २०२३ मध्ये समन्स बजावले. या समन्सविरोधात अख्तर यांनी दिंडोशी न्यायालयात धाव घेतली. दिंडोशी सत्र न्यायालयाने अख्तर यांच्या अर्जावर अंतिम सुनावणी होईपर्यंत राणावतच्या तक्रारीवरून न्यायालयीन कारवाईला स्थगिती दिली. ही स्थगिती उठल्यानंतर कंगनाविरोधात दाखल केलेल्या खटल्यावर पुन्हा सुनावणी होणार असल्याने कंगनाने उच्च न्यायालयात या प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत ॲड. रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत याचिका दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com