गोयल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

गोयल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : आपले आजारपण वाढत असून आपण आणखी सहन करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला जामीन देण्यात यावा, अशी न्यायालयाला विनवणी करणाऱ्या नरेश गोयल यांचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळाला आहे. जेट एअरवेजचे माजी संचालक नरेश गोयल यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणार नाही, त्यांची योग्य ती काळजी घेतली जाईल, असे स्पष्ट करत विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. मकरंद देशपांडे यांनी गोयल यांची न्यायालयीन कोठडी १६ जानेवारीपर्यंत वाढवली. जेट एअरवेजला कॅनरा बँकेने दिलेल्या ७२८ कोटींच्या कर्जापैकी ५३८ कोटी ६२ लाख कर्ज कंपनीने थकवल्याप्रकरणी बँकेने सीबीआयकडे लेखी तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने नरेश गोयल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. १ सप्टेंबर २०२३ रोजी गोयल यांना अटक करण्यात आली. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने नरेश गोयल यांच्याविरोधात मनी लॉन्डरिंगचा गुन्हा नोंदवत गोयल यांच्या कार्यालय व घरावर छापे मारले. ईडी कोठडीची मुदत संपल्याने गोयल यांना सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायलयात आज हजर करण्यात आले होते. त्या वेळी न्यायालयीने त्यांच्या कोठडीत वाढ केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com