महासागर या विषयावर पार्ले टिळकमध्ये  प्रदर्शन

महासागर या विषयावर पार्ले टिळकमध्ये प्रदर्शन

पार्ले टिळकमध्ये ‘महासागर’ प्रदर्शन
मुंबई, ता. ६ : पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या वतीने ‘ओशन अर्थात महासागर’ या विषयावर प्रदर्शन भरवण्यात आले आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या मुंबई विभागाच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. सोनिया सुकुमारन यांच्या हस्ते आज सकाळी ८.३० वाजता प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. दरवर्षी पाचही शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येत एका विषयाची संपूर्ण माहिती देणारे भव्य प्रदर्शन पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेच्या प्रांगणात भरवतात. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे. शनिवार, रविवारी हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून पहिल्याच दिवशी सुमारे पाच हजार लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com