भविष्याचा विचार करा, या सरकारला गाडा : आदित्य ठाकरे

भविष्याचा विचार करा, या सरकारला गाडा : आदित्य ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. ६ : भूतकाळात न रमता भविष्याचा वेध घ्या, या सरकारच्या काळात कोणतेही रोजगार मिळाले नाहीत, महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला गेले. त्यामुळे नाकर्त्या सरकारला गाडा, असे आवाहन शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आज ते शिवसेनेच्या मुंबईतील मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्याला शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते अजय चौधरी उपस्थित होते. आमच्या सरकारच्या कार्यकाळात सुरू झालेल्या कामांची उद्‍घाटने केली असती, तरी चालले असते, असे सांगत त्यांनी शिंदे सरकार नाकर्ते असल्याचा आरोप केला. मोदी सरकारने रोजगारनिर्मिती केली नाही. केवळ पक्ष फोडले, एक कुटुंबाचे दोन तुकडे केले, असा आरोप त्यांनी यावेळी केला. विरोधकांकडे ईडी पाठवणे हेच या सरकारचे काम आहे, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com