आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल

आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल

आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून मात्र अद्याप कोणतीही तक्रार दाखल नाही

पुणे, ता. ६ : ससून रूग्णालयातील कार्यक्रमात पोलिस कर्मचाऱ्यावर हात उचलणे भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्या चांगलेच अंगलट आले. कांबळे यांच्याविरुद्ध अखेर शुक्रवारी मध्यरात्री बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कांबळे यांनी मारहाण केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही.

पोलिस कर्मचारी शिवाजी सरक (वय ३०) यांनी याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आमदार कांबळे यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे बंडगार्डन पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी म्हणून नेमणुकीस आहेत. शुक्रवारी (ता. ५) ससून रुग्णालयातील नव्या इमारतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याने बंदोबस्तासाठी सरक यांची नेमणूक केली होती.

सरक हे व्यासपीठाजवळील पायऱ्यांजवळ थांबले होते. कार्यक्रम संपल्यानंतर आमदार कांबळे तेथील पायऱ्यांवरून खाली उतरत असताना त्यांचा तोल गेला, त्यावेळी त्यांनी साध्या वेशात असलेल्या फिर्यादीच्या गालावर फटका मारला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मधाळे करीत आहेत. दरम्यान, कांबळे यांनी अन्य एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वैद्यकीय मदत सेलचे प्रमुख जितेंद्र सातव यांनाही फटका मारला होता. याबाबत अद्याप तक्रार प्राप्त झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com