Mumbai Crime Ram Mandir: "रामभक्त आहोत, दर्शन घडवून आणतो", महिलेला गंडा घालून लाखोंचे दागिने पळवले

Mumbai Crime Ram Mandir: "रामभक्त आहोत, दर्शन घडवून आणतो",  महिलेला गंडा घालून लाखोंचे दागिने पळवले
Published on

Ayodhya Ram Mandir: आम्ही तुम्हाला श्रीरामाचे दर्शन घडवून आणतो, असे सांगत एका ज्येष्ठ महिलेला तिघा भामट्यांनी २ लाख ६६ हजारांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खडकपाडा भागातील लोटस डेंटल केअर सेंटरसमोर त्याच भागात राहणाऱ्या ५६ वर्षीय महिलेसोबत ही घटना घडली आहे. सदर महिला बुधवारी दुपारी खडकपाडा भागातून पायी जात होती. या वेळी त्यांना तीन भामट्यांनी अडवले. आम्ही राम भक्त आहोत, आम्ही तुम्हाला प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवून आणतो. यासाठी तुम्ही तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, इतर सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळून ठेवा, असे भामट्यांनी महिलेला सांगितले.

Mumbai Crime Ram Mandir: "रामभक्त आहोत, दर्शन घडवून आणतो",  महिलेला गंडा घालून लाखोंचे दागिने पळवले
Ayodhya Ram Mandir: Navi Mumbai च्या Vitthal Kamble यांना Prabhu Shreeram च्या पूजेचा मान

तिघा भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने जवळील २ लाख ६६ हजाराचा सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळला. हा ऐवज कुणी चोरू नये, म्हणून भामट्यांनी स्वतःकडे घेतला. आपणांस रामाचे दर्शन होत आहे, या आनंदात महिला होती. तेवढ्यात तिन्ही भामट्यांनी महिलेला एकाकी सोडून तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फसगत झालेल्या महिलेने खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.

Mumbai Crime Ram Mandir: "रामभक्त आहोत, दर्शन घडवून आणतो",  महिलेला गंडा घालून लाखोंचे दागिने पळवले
Ayodhya Ram Mandir च्या खाली गाडलं जाणारं टाईम कॅप्सुल, नेमकं आहे काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ram Lalla Aarti Darshan Made Easy Learn Offline Pass Process and Skip Online Waiting
ayodhya ram mandir julan utsav
Party workers also raised demands related to the Ayodhya Ram Temple donation issue during the programme.
Swami Govind Dev Giri
Marathi News Esakal
www.esakal.com