मुंबईत ४१ टक्के व्‍यक्तींना सहव्‍याधींनी जखडले

मुंबईत ४१ टक्के व्‍यक्तींना सहव्‍याधींनी जखडले

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईतील तरुण लठ्ठपणाच्या विळख्यात अडकले असून तब्बल ४१ टक्के व्यक्ती सहव्याधींसह जगत आहेत. लठ्ठ व्यक्तींना सांधेदुखी आणि ऑर्थोपेडिक समस्यांचा सामना करावा लागतो. २१ टक्के जणांना या गुंतागुंतीचा सामना करावा लागत असून मुंबईतील विशेषत: ४६ ते ५५ वर्षे वयोगटातील वजन कमी करण्याच्या वैद्यकीय उपचारांबाबत अज्ञान असून हे प्रमाण ३६.५९ टक्के आहे, असे एका वैद्यकीय अहवालातून उघड झाले आहे.

बेंगळूरु, मुंबई आणि दिल्लीतील एक हजार लठ्ठ तरुणांवर केलेल्या अभ्यासापैकी २० वर्षांखालील बेंगळूरुतील १५ टक्के तरुणांत एकापेक्षा जास्त सहव्याधी विकसित झाली होती. २६-३५ वर्षे वयोगटात, दिल्ली आणि मुंबईतील तरुणांत सहव्याधी अनुक्रमे ३६ टक्के आणि ४१ टक्के आहे, असे हेक्साहेल्थच्या अहवालात म्हटले आहे.

मुंबई, दिल्ली आणि बेंगळूरु येथे राहणाऱ्या १००० व्यक्तींच्या डेटाचे सर्वसमावेशक विश्लेषण केले. हे सर्वेक्षण ३० किंवा त्याहून अधिक बॉडी मास इंडेक्स (बीएमआई) असलेल्या १८ ते ५५ वर्षे वयोगटातील व्यक्तींवर केंद्रित होते. त्या सर्वांना लठ्ठ म्हणून वर्गीकृत करण्यात आले होते. सुदृढ क्रिया करणाऱ्यांत सक्रियपणे भाग घेणाऱ्या व्यक्तींमध्ये मुंबईची सर्वाधिक टक्केवारी ४३.७० टक्के आहे. शिवाय, मुंबईत डायटिंग करणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे, असेही सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
----
कोट
दोन महिन्यांच्या सर्वसमावेशक सर्वेक्षणात ​​हेक्साहेल्थने भारतातील लठ्ठपणाच्या महत्त्वाच्या समस्येचा शोध घेतला. २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांमध्ये सहव्याधीचे प्रमाण चिंताजनक आहे.
- अंकुर गिग्रस, सीईओ आणि सह-संस्थापक, हेक्साहेल्थ
----
अहवाल काय सांगतो...
२६ ते ३५ वयोगटात जुनाट सांधेदुखी आणि उच्च रक्तदाबात लक्षणीय वाढ झाली आहे. या गटात सहव्याधी संख्या चार पटीने वाढली आहे.
३६ ते ४५ वयोगटात प्रवेश केल्यानंतर सहव्याधीच्या संख्येत ५० टक्के वाढ होते. लठ्ठपणा ही आरोग्याविषयी महत्त्वाची चिंता असून देशात दरवर्षी ५.८७ दशलक्ष मृत्यू होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com