BJP
BJPSakal

Loksabha News: कामांची जनजागृती करण्यासाठी भाजपने हाती घेतली महत्वाची मोहीम; आता गावोगावी...

Published on

Loksabha News: श्रीराम मंदिर निर्माणाच्या भव्य सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या सौरऊर्जा अभियानाची अंमलबजावणी आणि केंद्र व राज्याच्या विकास योजनांची माहिती देण्यासाठी भाजप आता प्रत्येक गावात एक नेता पाठवणार आहे. हे नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना नेमून दिलेल्या गावात किमान चार वेळा जाणार असून एकदा या गावात २४ तास मुक्काम ठोकणार आहेत.

BJP
Loksabha Politics : लोकसभेसाठी कॉंग्रेसने 'या' मतदार संघावर केला दावा; ठाकरे गटही जागेसाठी आग्रही

महाराष्ट्रातील भाविकांच्या सोयीसाठी २९ जानेवारीपासून अयोध्येकडे रेल्वे निघणार आहेत. अयोध्यकडे जाणाऱ्या भाविकांची सोय करण्यासाठी भाजपने त्यांच्या जाण्या-येण्यासाठी पूरक व्यवस्था तयार केली आहे. महाराष्ट्रातील ३८ लोकसभा मतदारसंघ आज अयोध्येशी रेल्वेने जोडले गेले आहेत. सरळ किंवा एखाद्या ठिकाणी गाडी बदलून या मतदारसंघातील मंडळी दर्शन करून परत येऊ शकतील. दर्शनाची सोय करण्याचे काम पक्षातर्फे केले जाणार आहे. महाराष्ट्रात या संदर्भात अन्य मित्रपक्षांकडूनही विनंती समोर येत असून त्याचाही विचार केला जाईल, असे समजते.

अयोध्येतील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर एक कोटी घरात सौरऊर्जा पुरवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. महाराष्ट्रातील किती घरांना या योजनेचे लाभार्थी करता येईल, याचा शोध घेणे सुरू झाले आहे. गावपातळीवर या योजनेचा लाभ घेऊ शकतील अशी घरे किती याचा शोध भाजपचे कार्यकर्ते अनौपचारिकरित्या घेत आहेत.

BJP
Loksabha Election 2024: लोकसभा लढवण्यावरून प्रश्न अन् पृथ्वीराज चव्हाणांनी हात का जोडले?

योजनेचा तपशील जाहीर होताच वीजमंडळही हे काम हाती घेईल. विशिष्ठ मर्यादेतले उत्पन्न तसेच जागेसंबंधीची कागदपत्रे हे दोन निकष लाभ मिळवण्यासाठी ठेवले जातील.

वीजकंपन्यांवरील भार कमी होईल
सध्या भारतात अपारंपारिक उर्जा स्त्रोतांच्या माध्यमातून ७३.३१ गीगावॅट ऊर्जा तयार होते. डिसेंबरअखेरीस भारतातील सौरऊर्जेचा वापर करणाऱ्या घरांमध्ये ११.०८ गीगावॅटचे उत्पादन आणि वापर होत आहे. घराघरात सौरऊर्जा तयार झाली तर वीजकंपन्यांवरील भार कमी होईल आणि कुटुंबांवरचा ताण कमी होईल. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे अधिकाधिक लाभार्थी महाराष्ट्रात असावेत, असा प्रयत्न आहे. नेत्यांच्या ‘गाव चलो’ अभियानात अशा कुटुंबांशीही संवाद साधला जाईल. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात आज पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

BJP
Loksabha Election Date: लोकसभा निवडणूक १६ एप्रिलला होणार? निवडणूक आयोगाच्या पत्राने खळबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com