जुईनगर येथील गणेश मैदानात अनधिकृत पार्किंगमुळे नागरिक त्रस्त

जुईनगर येथील गणेश मैदानात अनधिकृत पार्किंगमुळे नागरिक त्रस्त

जुईनगर येथील गणेश मैदानात अनधिकृत पार्किंग
महापालिका आयुक्‍तांकडे तक्रार; कारवाई करण्याचे आश्‍वासन
वाशी, ता. २५ (वार्ताहर) ः नवी मुंबईतील जुईनगर सेक्टर २५ येथील गणेश मैदानामध्ये अनधिकृत पार्किंग केली जात असल्‍याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जुईनगर सेक्टर २५ येथील गणेश मैदान हे नवी मुंबई महापालिकेने नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी, खेळण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. मात्र मैदानात अनेक चारचाकी व दुचाकी वाहने पार्क केली जात आहेत. अशा प्रकारे वाहने मैदानात उभी केल्यामुळे मैदानावर खेळणाऱ्या मुलांना अडथळा निर्माण होत आहेत. शिवाय फेरफटका मारण्यासाठी आलेल्या रहिवाशांनाही त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नुकत्याच नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबतच्या बैठकीत स्थानिकांतर्फे विजय साळे यांनी गणेश मैदानामधील अनधिकृत पार्किंगचा मुद्दा मांडला होता. यावेळी गणेश मैदानाला योग्यरीत्या दरवाजा नसल्यामुळे वाहनचालक सर्रासपणे गाड्या मैदानामध्ये पार्क करत असल्याची माहिती विजय साळे यांनी दिली. या वाहनांना निर्बंध घालण्यासाठी महापालिकेतर्फे मैदानाला चांगला गेट लावून देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. तसेच मैदानात काही गैरप्रकार जसे की पथदिवे फोडणे, अमली पदार्थांचे सेवन इत्यादी सुरू असल्याचीही माहिती त्यांनी आयुक्तांना दिली. तसेच या गोष्टींना आळा घालण्यासह त्या‍च्‍यावर नजर ठेवण्यासाठी मैदानात आणि आसपासच्या परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशीही मागणी साळे यांच्याकडून करण्यात आली आहे. जेणेकरून पुन्हा गैरप्रकार झाले तर सीसी टीव्हीतर्फे त्यावर नजर ठेवून योग्य ती कारवाई करता येऊ शकते, असे विजय साळे यांनी सांगितले. यावेळी महापालिका आयुक्‍तांकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com