Manoj Jarange in Mumbai: मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील वाहतुकीत बदल; 'हा' रस्ता राहणार बंद

Manoj Jarange in Mumbai: मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील वाहतुकीत बदल; 'हा' रस्ता राहणार बंद

Navi Mumbai Maratha Andolan: मराठा आरक्षणाचा मोर्चा पामबीच मार्गे वळवण्यात आल्याने पामबीच मार्ग इतर वाहनांसाठी पूर्णत: बंद करण्यात आला आहे. तसेच इतर वाहनांसाठी पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित करून या मार्गावरून जाण्यास सूचित केले आहे. गुरुवारी सायंकाळपासून काही मोर्चेकऱ्यांची वाहने नवी मुंबईत डेरेदाखल झाली आहेत. त्यांच्या मोर्चासोबत मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचा ताफा आहे.

या मोर्चाचा एक दिवसाचा मुक्काम नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात असणार आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील अंतर्गत रस्त्यावरील वाहनांच्या वाहतुकीचे व पार्किंगचे नियोजन व्हावे, यासाठी पामबीच मार्ग इतर वाहनांसाठी पूर्णत: बंद करण्यात आला आहे. (Manoj Jarange Patil in Mumbai)

Manoj Jarange in Mumbai: मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील वाहतुकीत बदल; 'हा' रस्ता राहणार बंद
Manoj Jarange Mumbai कडे निघाले असतानाच, Prakash Ambedkar यांनी अजब सल्ला का दिला?

किल्ला जंक्शन (एनआरआय), सीवूड्स सेक्टर नं. ५० सिग्नल, अक्षर सिग्नल, टी. एस. चाणक्य सिग्नल, वजिराणी सिग्नल, सारसोळे सिग्नल, मोराज सर्कल येथून पामबीच मार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांना वाशी, कोपरी, एपीएमसी तसेच मुंबई, ठाण्याकडे जाण्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच या मार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांना पर्यायी मार्गावरून जाण्यास सूचित करण्यात आले आहे.

सीबीडी सर्कल येथून भाऊ पाटील चौक-दिवाळे गाव सिग्नल ते किल्ला जंक्शन येथून पाम बीचकडे व मुंबई, ठाणेकडे तसेच वाशी, कोपरी, एपीएमसीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना किल्ला जंक्शन येथून पामबीच रोडने जाण्यास प्रवेश बंद केला आहे.(Mumbai News Maratha Andolan)

Manoj Jarange in Mumbai: मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील वाहतुकीत बदल; 'हा' रस्ता राहणार बंद
Manoj Jarange : बंद दाराआड चर्चा? 'त्या' प्रश्नावर जरांगे पाटील भडकले, म्हणाले...

तसेच तुर्भे ते ऑरेंजा सर्कल वाशी मार्गे जाणारे व येणारे बसेस व इतर सर्व प्रकारच्या वाहनांना तुर्भे रेल्वे स्टेशन उड्डाणपूल येथून व छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथून प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कोपरखैरणे व्हाईट हाऊसकडून पामबीच कोपरीकडे येणाऱ्या सर्व वाहनांना कोपरी उड्डाणपुलावर ठाणे-बेलापूर मार्ग येथून प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

सानपाडा ब्रिज शिकारा हॉटेल येथून अन्नपूर्णा सिग्नलकडे जाणारे व येणारे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत. ब्लू डायमंड चौक येथून कोपरीकडे व पामबिचकडे तसेच एपीएमसीकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना ब्लू डायमंड चौक येथून प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे.

वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ऑरेंजा सर्कलकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना बंदी घातली आहे. वाशी परिसरातील रहिवाशांना आपली वाहने पामबिच मार्गावर आणण्याकरिता बंदी घालण्यात आली आहे.(Vashi Breaking)

Manoj Jarange in Mumbai: मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील वाहतुकीत बदल; 'हा' रस्ता राहणार बंद
Manoj Jarange : इंदोरीकर महाराजांचा मराठा मोर्चाला पाठिंबा; कीर्तनाचे कार्यक्रम केले रद्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com