Mumbai Pune Express Way
Mumbai Pune Express Waysakal

Express Way: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात मदतकार्याची जपानमध्ये चर्चा

मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, मृत्युंजय देवदूत व महामार्ग पोलिस यंत्रणा जीवरक्षक म्हणून काम करते. या कामाची जपानच्या निप्पोन होसो क्योकई टीव्ही चॅनेलने दखल घेतली आहे.

Mumbai Pune Express Way
Mumbai Pune Express Way: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे गुरूवारी पाच तास बंद

मुंबई-पुणे महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर अपघातांच्या घटना वारंवार घडत असतात. या कठीण काळात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी विविध सामाजिक संस्था, मृत्युंजय देवदूत, तसेच महाराष्ट्र राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांचे सदस्य धावत असतात. जिवाची बाजी लावून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ही मंडळी निःस्वार्थीपणे काम करत असतात. त्यांच्या या कामाची दखल जपानमधील प्रसारमाध्यमांनी देखील घेतली आहे.

Mumbai Pune Express Way
Mumbai Pune Express Way: नागरिकांनो लक्ष द्या; मुंबई -पुणे एक्स्प्रेसवेवर आज दोन तासांचा ब्लॉक!

यावेळी खोपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत, सहाय्यक पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर, महामार्ग वाहतूक पोलिस यंत्रणेच्या पोलिस निरीक्षक गौरी मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश भोसले यांच्यासमवेत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि मृत्युंजय देवदूत सदस्यांनी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील अपघातप्रवण क्षेत्रावर जाऊन प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली.

यावेळी अपघातातील वाहनांमध्ये कशा पद्धतीने मदत कार्य केले जाते. त्याचप्रमाणे अपघात नियंत्रित करण्यासंबंधी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याची चर्चा करण्यात आली.

Mumbai Pune Express Way
Mumbai Pune Express Way: महामार्गावरील अपघात तब्बल इतक्या टक्क्यांनी घटले; हे आहे कारण

लघुपटातून कामाचा आढावा
- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ मध्ये बोरघाटात होणाऱ्या मोठ्या वाहनांचे अपघात रोखण्यासाठी हाईट बॅरिकेड्सची पाहणी जपानच्या या चमूने केली. तसेच १५ एप्रिल २०२३ रोजी दरीत बस कोसळून झालेल्या अपघातावेळच्या बचाव कार्याचे प्रत्यक्ष घटनास्थळावरून माहिती घेतली.
- घाटामध्ये अपघात झाल्यानंतर रेस्क्यू व्हॅन, रुग्णवाहिका, खासगी चारचाकी आणि दुचाकी अशी वाहने वापरून घटनास्थळी बचाव यंत्रणा मदतकार्य करते याचे प्रात्यक्षिकही पाहिले. तसेच विना मोबदला होणाऱ्या कामाची सर्व माहिती असलेला लघुपट जगभर प्रसिद्ध करणार आहे.

घाटामध्ये अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, मृत्युंजय देवदूत ग्रुप, स्थानिक व महामार्ग पोलिस या यंत्रणेच्या माध्यमातून होत असलेले काम कौतुकास्पद आहे. अशाच पद्धतीची कार्यप्रणाली सर्व महामार्गावर विकसित झाल्यास अपघातावर नियंत्रण येऊ शकते. या यंत्रणेचे कार्य टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून जगभर दाखवण्यात येईल.
- मितामुरा तारो, ब्यूरो चीफ, एनएचके न्यूज जपान

Mumbai Pune Express Way
Mumbai Pune Expess Way: आडोशी गावाच्या हद्दीत झाला भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com