ghodbandar rode
ghodbandar rode sakal

Mumbai Metro: मेट्रो-४ च्या कामांमुळे ठाण्यातील 'हा' महत्वाचा रस्ता रहाणार बंद; पर्यायी रस्त्यांची केली व्यवस्था

Published on

ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील तत्त्वज्ञान सिग्नलजवळ मेट्रो-४ च्या बिमचे काम सुरू करण्यात येत आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून ठाणे शहर वाहतूक विभागाने २८ फेब्रुवारी रात्री बारा वाजल्यापासून ते २९ फेब्रुवारी पहाटे ५ वाजेपर्यंत वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचना जारी केली आहे.

ghodbandar rode
Mumbai Metro: मुंबईकरांना मोठा दिलासा; आता 'आरे ते बीकेसी' दरम्यान धावणार मेट्रो!


घोडबंदर रोडवरील तत्त्वज्ञान सिग्नल येथे पोर्टल बीमचे काम सुरू केल्यानंतर केलेल्या वाहतुकीतील बदल आणि पर्यायी मार्ग सुचविण्यात आलेले आहेत. मुंबई, ठाणेहून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

तर पर्यायी मार्ग म्हणून वाहने कापूरबावडी वाहतूक शाखेजवळून उजवे वळण घेत खारेगाव टोलनाका, माणकोली, अंजूरफाटा मार्गे इच्छितस्थळी जातील; तर दुसऱ्या पर्यायी मार्ग वाहने कशेळी, अंजूरफाटा मार्गे जातील. मुंब्रा, कळवाहून घोडबंदरकडे जाणाऱ्या जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

ghodbandar rode
Mumbai Metro : मेट्रोचा खोळंबा, तांत्रिक बिघाडामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प, प्रवाशांची कोंडी!

ही वाहने खारेगाव खाडी पुलावरून खारेगाव टोलनाका, माणकोली, अंजूरफाटा मार्गे इच्छितस्थळी जातील. नाशिकहून घोडबंदरकडे येणाऱ्या वाहनांना माणकोली नाका येथे प्रवेश बंद असणार आहे.

ही वाहने माणकोली पुलाखालून उजवे वळण घेत अंजूरफाटा मार्गे जातील. तत्त्वज्ञान सिग्नलजवळ पोर्टल बीमचे काम करताना हलकी वाहने तत्त्वज्ञान सिग्नल येथून डावीकडे वळण घेऊन सेवा रस्त्याने रोडने मानपाडा ब्रिज येथून मुख्य रस्त्यास मिळून इच्छितस्थळी जातील.

ghodbandar rode
Mumbai Metro: मुंबई मेट्रो सेवा कोलमडली; गाड्या अडकल्या, मेट्रोच्या ट्रॅकवरुन प्रवासी निघाले चालत Video Viral

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com