मृत शार्कच्या गर्भाशयात आढळली १५ पिल्ले

मृत शार्कच्या गर्भाशयात आढळली १५ पिल्ले

मनोर, ता. १५ : पालघर जिल्ह्यात मनोरलगत वैतरणा खाडीपात्रात सापडलेल्या बुल शार्क माशाचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचे शवविच्छदनानंतर स्पष्‍ट झाले आहे. साडेचारशे किलो वजन असलेल्या या मादी बुल शार्कच्या गर्भाशयात १५ पिल्ले सापडली आहेत. पिल्लांना जन्म देण्यासाठी शुद्ध पाण्याच्या स्रोताच्या शोधात ही मादी खाडीपात्रात आली असावी, असा अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी राहुल संखे यांनी वर्तवला आहे. मृत्यू आधी तिने काही पिल्लांना जन्म दिल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उपवनसंरक्षक कार्यालयाच्या आवारात या माशाचे शवविच्छेदन करण्यात आले. गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर डोके गर्भमुखाच्या बाजूने असते, परंतु मृत शार्क माशाच्या गर्भाशयाचा मुखाजवळ पिल्लांच्या शेपटीचे फिन आढळले. प्रत्येक बेबी शार्क माशाला वेगळी नाळ आणि प्लेसंटा बॅग होती. गर्भाशयातून १५ बेबी शार्क काढण्यात आले. प्रत्येक पिल्लांचे वजन पाच किलोपेक्षा अधिक होते. बुल शार्कचे श्रवणेंद्रिय मस्तकाच्या पाठीमागे उजव्या व डाव्या बाजूस हाडाच्या पोकळीत असते. दोन अंतर्कर्णांचा उपयोग ध्वनिज्ञान आणि काही प्रमाणात तोल सांभाळण्यासाठी होत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. मनोर येथील वैतरणा खाडीच्या शेवटच्या भागात आढळलेल्या शार्क माशाची ओळख पटवून माशाचे संवर्धन आणि जतन करण्याची आवश्यकता आहे, असे पालघर पंचायत समितीचे पशुप्रजनन शास्त्र अधिकारी डॉ. राहुल संखे यांनी व्यक्त केले.
----
११०० किलोमीटरपर्यंत प्रवासाची क्षमता
बुल शार्क युरिहॅलिन असल्याने खाऱ्या आणि गोड्या पाण्यातही वाढू शकतात. बुल शार्क नद्यांच्या वरच्या प्रवासासाठी ओळखले जातात. सुमारे १,१०० किलोमीटर (७०० मैल) पर्यंत प्रवास करण्यासाठी बुल शार्क ओळखले जातात. गोड्या पाण्यात माणसांसोबत काही संवाद नोंदवले गेले आहेत. मोठ्या आकाराचे बुल शार्क किनाऱ्यावर हल्ल्यांसाठी जबाबदार असतात.
-------
गोड्या पाण्याच्या अधिवासात राहण्याची क्षमता असूनही बुल शार्क गोड्या पाण्यातील शार्क नाहीत. आफ्रिकेतील झांबेझी शार्क आणि निकाराग्वामधील बुल शार्क (कार्चरिनस ल्यूकास) रेक्वीम शार्कची एक प्रजाती आहे. ही प्रजाती जगभरात समुद्रकिनाऱ्यांलगत उबदार, उथळ पाण्यात आणि नद्यांत आढळते. ते आक्रमक असल्यामुळे बुल शार्कची संख्या कमी होते. त्यांची आययूसीएन रेड लिस्टमध्ये असुरक्षित प्रजाती म्हणून त्यांची नोंद आहे. यापूर्वी गुजरातच्या समुद्र किनारी बुल शार्क मासा आढळलेला आहे.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com