Railway News: आता बदलापुर ते नवी मुंबई करता येणार थेट रेल्वे प्रवास; मार्गाची झाली चाचपणी

Railway News: आता बदलापुर ते नवी मुंबई करता येणार थेट रेल्वे प्रवास; मार्गाची झाली चाचपणी

प्रवासी सुविधेत वाढ: बदलापूर-नवी मुंबई दरम्यान नवीन रेल्वे मार्गाची चाचपणी, वेळ व इंधन बचतीची अपेक्षा


Railway News: मुंबई, नवी मुंबई गाठण्यासाठी रोज लाखो प्रवाशांचा ओढा असणाऱ्या बदलापूरजवळ कासगाव ते कामोठे असा नवीन रेल्वे मार्ग उभारण्याचे वेध लागले आहेत. खूप वर्षांच्या मागणीनंतर या नवीन मार्गाची चाचपणी करण्यास मध्य रेल्वेने तयारी दर्शवली आहे.

Railway News: आता बदलापुर ते नवी मुंबई करता येणार थेट रेल्वे प्रवास; मार्गाची झाली चाचपणी
Mumbai Local: टॅक्सी चालकांची अरेरावी सुरूच ; स्थानकांबाहेर प्रवाशांची लूट   

दहा दिवसांत त्याचा आराखडा तयार करून पुढे मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. या मार्गाला हिरवा कंदील मिळाल्यास ठाणे ते सानपाडा असा ६० किमीचा होणारा प्रवास भविष्यात अवघ्या १८ किमीवर येईल. वेळ, इंधनाची बचत होईल, तसेच याचा फायदा केवळ अंबरनाथ, बदलापूरवासीयांनाच नव्हे तर कल्याण, उल्हासनगर, भिवंडी इत्यादी शहरातील सुमारे ३५ लाख प्रवाशांना त्याचा लाभ होणार आहे.(badlapur to navi mumbai)

Railway News: आता बदलापुर ते नवी मुंबई करता येणार थेट रेल्वे प्रवास; मार्गाची झाली चाचपणी
Mumbai Local News: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल!

ठाणे, कल्याणनंतर आता अंबरनाथ, बदलापूर परिसरात नागरीकरण झपाट्याने होत आहे. वास्तव्यासाठी स्वस्त-मस्त पर्याय असला तरी नोकरी-व्यवसाय, शिक्षणासाठी येथील नागरिकांना रोज मुंबई, नवी मुंबईला यावे लागते. त्यासाठी त्यांना मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलचा आधार घ्यावा लागतो. त्यातही नवी मुंबई गाठायची असेल तर ठाणे किंवा कुर्ला हार्बर रेल्वेचा फेरा मारावा लागतो. भौगोलिकदृष्ट्या पाहिले तर बदलापूर आणि नवी मुंबई हे अंतर फारसे नाही. केवळ वाहतुकीचा योग्य पर्याय नसल्याने नागरिकांचा प्रवास, कष्ट आणि वेळ खर्ची पडत आहे. म्हणूनच तिसरी- चौथी मार्गिकेचे काम मार्गी लावत असताना बदलापूर- वांगणीदरम्यानचे अंतर कमी करणाऱ्या कासगाव स्थानक उभारून त्याला नवी मुंबई मार्ग जोडण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष व स्थानिक भाजप नेते राम पातकर हे यासाठी प्रयत्न करीत आहेत.

पातकर यासंदर्भात गेली अनेक वर्षे ते अभ्यास करत असून याबाबत अनेक प्रस्ताव त्यांनी मध्य रेल्वे तसेच मंत्रालयाला पाठवले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदनही दिली आहेत. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकतीच त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेत संपूर्ण प्रकल्प समजावून सांगितला. याची दखल घेत कपिल पाटील यांनीही मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बैठक घेत कासगाव ते कामोठे या नवीन मार्गाची चाचपणी करण्याचे निर्देश दिले.

Railway News: आता बदलापुर ते नवी मुंबई करता येणार थेट रेल्वे प्रवास; मार्गाची झाली चाचपणी
Mumbai Local News: पश्चिम रेल्वेवर तीन दिवस मेगाब्लॉक; गाडयांना होणार उशीर

त्याचा दहा दिवसांत आराखडाही तयार करायला सांगितला आहे. त्यानुसार कामाला सुरुवातही झाली आहे. या नवीन मार्गासाठी राज्यापासून ते केंद्रापर्यंत ज्या परवानग्या लागतील त्या मिळवून देण्याची ग्वाहीपण दिली आहे. त्यामुळे ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या प्रवासी वाहतुकीला उत्तम पर्याय मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

अंतर कमी होणार


मोठा पाऊस किंवा पूर आला की मध्य रेल्वे बंद पडते. याचा सर्वाधिक फटका बदलापूरवासीयांना होतो. यासाठी समांतर मार्ग काळाची गरज आहे. कासगाव, चामटोली येथे स्थानक उभारल्यानंतर साडेतीन- चार किमीचा बोगदा पाडून पलीकडे मोरबे पुढे १८.५ किमीवर कामोठे गाठता येणे शक्य आहे.

आता बदलापूर ते कामोठे जायचे असेल तर ६५ किमीचे अंतर पार करावे लागते. कासगाव ते कामोठे हे मानसरोवर स्थानकास जोडल्यास हार्बर मार्गिकेने कुर्ला मार्ग सीएसटीला कमी वेळेत पोहोचवू शकतो.

अंबरनाथ, बदलापूर परिसरातील प्रवासी ठाणे न गाठता कमी वेळेत नवी मुंबईत जाऊ शकतील. या रेल्वे लाईनमुळे डिझेल, पेट्रोल बचत मोठ्या प्रमाणात होईल. यासोबतच नवी मुंबईत शैक्षणिक संस्था व एमआयडीसी असल्याने विद्यार्थ्यांना व कामगारांसाठीसुद्धा फायदेशीर होईल.

बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कर्जत परिसरातील रहिवाशांना पनवेलमार्गे कोकणात जाण्यासाठी जवळचा मार्ग मिळेल.

Railway News: आता बदलापुर ते नवी मुंबई करता येणार थेट रेल्वे प्रवास; मार्गाची झाली चाचपणी
Mumbai Local News: पश्चिम रेल्वेवर तीन दिवस मेगाब्लॉक; गाडयांना होणार उशीर

कमी खर्चात उत्तम पर्याय


सध्या सर्वच शहरांना मेट्रोचे वेध लागले आहेत; पण देशात मेट्रो अशस्वी ठरली असून ठाणेपर्यंत हा मार्ग येण्यासाठी २०२५ ची वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर कल्याण, भिवंडीचा क्रमांक लागेल. बदलापूरला मेट्रो येईपर्यंत खूप उशीर होईल.

त्यामुळे मध्य रेल्वेची नवीन मार्गिकाच याला उतारा ठरणार आहे. रेल्वे मार्ग उभारणीसाठी आवश्यक असलेला साडे तीन ते चार किमीचा बोगदा व सरकारी जमीन उपलब्ध असल्याने भूसंपादनासाठी कमी खर्च येईल. रेल्वे उभारणीला अंदाजे किलोमीटरला ६० कोटी खर्च धरल्यास १,११० कोटी खर्च व भूसंपादनाला १५० कोटी असा अंदाजे १,३०० कोटी खर्च येण्याची शक्यता आहे.

Railway News: आता बदलापुर ते नवी मुंबई करता येणार थेट रेल्वे प्रवास; मार्गाची झाली चाचपणी
Mumbai Local News: कल्याण-बदलापूरदरम्यान रेल्वेच्या चौथ्या मार्गिकेचे काम २०२६ पर्यंत पूर्ण होणार?

वडोदरा कॉरिडॉरचा फायदा


विरार- अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरवर जेएनपीटी- वडोदरा प्रस्तावित आहे. हा कॉरिडॉर बदलापूरजवळ आहे.

बदलापूर आणि परिसरात मोठ-मोठे प्रकल्प येत आहेत. हे लक्षात घेता कामोठेमार्गे पनवेलला जोडणाऱ्या मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर नवीन रेल्वे मार्गाची गरज आहे. मुंबई, वडोदरातून जेएनपीटीला ये-जा करण्यासाठी पॉईंट दिल्यास मालवाहतुकीला व प्रवाशांना फारच दिलासा मिळेल. तसेच बदलापूर येथे होऊ घातलेल्या लॉजेस्टीक पार्कला उपयोग होईल.

Railway News: आता बदलापुर ते नवी मुंबई करता येणार थेट रेल्वे प्रवास; मार्गाची झाली चाचपणी
Mumbai Local: एमयूटीपी प्रकल्पांना ७०० कोटींची तरतूद!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com