Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray Eknath Shindeesakal

Eknath Shinde: बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे पण काही लोक घरगडी समजतात

घरावर तुळशीपत्र ठेवायची वेळ तरुणांवर येणार नसून त्यांना नोकरीचे पत्र मिळेल
Published on

Thane News: मुख्यमंत्री असलो तरी माझ्यातला कार्यकर्ता आजही जिवंत आहे आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे, असे सांगत प्रत्येक युवा सैनिक हा मुख्यमंत्री असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

तसेच बाबासाहेबांच्या शिवसेनेला वाचविण्यासाठी धाडस करून पाऊल उचले असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Cm Eknath Shinde : म्हाडाच्या माध्यमातून प्रत्येकाला परवडणारे घर देणार

ठाण्यातील रेमंड मैदानात युवा सेनेचा राज्यस्तरीय मेळावा शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि चित्रकार शशिकांत धोत्रे यांना ‘शिवगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Eknath Shinde: ..तर वर्षा निवासस्थानी लावला जाणार वडापाव-चहाचा स्टॉल

त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे पण काही लोक घरगडी समजतात. परंतु आता पक्षाचा कोणीही मालक नाही आणि नोकरही नाही. सर्व जण कार्यकर्ते आहेत.

कोणी मोठा आणि छोटा नाही. शिवसेना पुढे न्यायची आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण याप्रमाणे काम करायचे असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, घरावर तुळशीपत्र ठेवायची वेळ तरुणांवर येणार नसून त्यांना नोकरीचे पत्र मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

एका व्यक्तीला शिवसैनिकांनी आधीच नारळ दिला


बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्याला आरसा दाखविण्याची गरज असून एका व्यक्तीला सर्व शिवसैनिकांनी आधीच नारळ दिला आहे, अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray यांच्या रणरागिनीचा खरमरीत पत्र लिहित पक्षाला रामराम | CM Eknath Shinde | Shivsena

खिचडी आणि कोरोना घोटाळ्यात काही लोक कारागृहात गेले आणि आता आणखी काही लोक जाणार आहे. त्यांना उशी आणि सतरंजीची गरज लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांना राज्यभरात कार्यक्रमांना जावे लागत असल्याने ते हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात. आधीचे मुख्यमंत्री घराबाहेर पडत नव्हते म्हणून हेलिकॉप्टर प्रवास टीका त्यांच्यावर होत नव्हती, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कुठल्याही काँग्रेस नेत्याने बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिलेली नाही. तसेच काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना हिंदू विचारधारा आवडत नाही, असा आरोप खासदार मिलिंद देवरा यांनी केला..

Uddhav Thackeray Eknath Shinde
CM Eknath Shinde : ''दोन-चार टकल्यांना घेऊन पक्ष मोठा होत नसतो'', एकनाथ शिंदेंचा रोख नेमका कुणाकडे?

वाहतूक कोंडी


मेळाव्यासाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे आले होते. गर्दी इतकी झाली होती की कार्यक्रमस्थळी बसण्यासाठी जागा शिल्लक राहिली नसल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना बाहेरच थांबावे लागले.

पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची चारचाकी आणि दुचाकी वाहने उभी करण्याची व्यवस्था मैदान परिसरात करण्यात आली होती.

परंतु तिथे वाहने उभी करण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने अनेकांनी परिसरातील रस्त्यावर वाहने उभी केली. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कॅडबरी चौकातील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Uddhav Thackeray Eknath Shinde
CM Eknath Shinde : लालपरीचे गावकऱ्यांसोबत एक ऋणाबंधाचे नाते, ते पुढेही जपले गेले पाहिजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com