Railway News
Railway News sakal

Railway News: भरतीचा 'तो' आदेश निघाला बनावट; रेल्वेने दिले स्पष्टीकरण!

Published on

रेल्वे सुरक्षा दलामध्ये (आरपीएफ) ४,२०८ रिक्तपदांच्या भरतीचा एक बनावट संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

अनेकांनी यासंदर्भात रेल्वेकडे विचारणा केली होती, त्यानंतर हा मेसेज फेक असल्याचे उघड झाले. याबाबत भारतीय रेल्वेने स्पष्टीकरण देत अशा बनावट संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन उमेदवारांना केले आहे.

Railway News
Railway News: मुंबईतील रेल्वे, मेट्रो स्थानकात बसवण्यात येणार १८८ एईडी मशिन्स

मध्य रेल्वेने सांगितले की, RTUEXAM.NET या संकेतस्थळावर रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)मध्ये शिपाई आणि उपनिरीक्षकांच्या ४,२०८ रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात एक बनावट संदेश प्रसारित केला जात आहे. आरपीएफ किंवा रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा कोणत्याही प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे अशी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही.

Railway News
Railway News: पनवेल-कर्जत रेल्वेच्या कामाला वेग; प्रवाशांना लवकरच मिळणार दिलासा

हा संदेश पूर्णपणे खोटा आणि चुकीची आहे. भारतीय रेल्वे अशा बनावट भरती सूचनांविरुद्ध सतर्क करत आहे आणि लोकांनी अशा खोट्या बातम्यांना बळी पडू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Railway News
Railway News: प्रवाशांना मिळणार दिलासा; मुंबई ते प्रयागराजदरम्यान विशेष रेल्वे गाड्या!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com