कार्यकर्ता परिचय संमेलन

कार्यकर्ता परिचय संमेलन
Published on

घाटकोपरमध्ये कार्यकर्ता परिचय संमेलन
घाटकोपर, ता. ३ (बातमीदार) ः घाटकोपर पूर्व, रमाबाई नगर येथे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने मुंबई कार्यकर्ता परिचय परिषदेचे आयोजन केले होते. राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीशी निगडित समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहीद स्मारक सभागृहात झालेल्‍या कार्यक्रमात संघटना वाढवण्यासाठी, जास्तीत जास्त लोकांना संघटित करण्यासाठी चर्चा करण्यात आली. या वेळी आमचा वापर होणार नाही, आम्ही आमच्या हक्कांसाठी लढू, विदर्भात संघटना कार्यरत आहे, येथेही आम्ही समाजासाठी संघटन करत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष बागडे यांनी सांगितले. कार्यक्रमाला दिलीप कदम, शरद बनसोडे, वैशाली दुपटे, पूर्णिमा पाईक राव, विकास काटे, रत्ना पाटोळे, हंसराज उरकुडे, मनीषा बनसोडे, भारती जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com