

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात मुंबईकराच्या काय अपेक्षा आहेत, हे समजून घेण्यासाठी भाजप दोन लाख नागरिकांकडून सूचना गोळा करणार आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. या मोहिमेंतर्गत समाजाच्या सर्वच घटकांकडून सूचना घेतल्या जाणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे आजपासून देशभर १५ मार्चपर्यंत ‘संकल्प पत्र अभियान’ राबवण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या जाहीरनाम्यासाठी देशभरातून नागरिकांच्या सूचना मागवण्यात येत आहेत. याअंतर्गत मुंबईतही भाजप पदाधिकारी नागरिकांपर्यंत जाऊन या सूचना गोळा करणार आहेत.
मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशन आणि सार्वजनिक ठिकाणी सूचनापेटी ठेवली जाणार आहे. याशिवाय घरोघरी जाऊन या सूचना गोळा करणार आहेत. यात चार्टर्ड अकाऊंटंट, वकील, शिक्षक, डॉक्टर, आयटी प्रोफेशनल्स, व्यापारी, गायक, अभिनेता, खेळाडू यांच्यासह सर्वच समाजघटकांकडून सूचना घेतल्या जाणार आहेत.
-----
कुठे नोंदवाल सूचना?
प्रत्येक लोकसभा विधानसभा क्षेत्रात यासाठी एक खास संकल्प पेटी तयार करण्यात आली आहे. तसेच ९०९०९०२०२४ या नंबरवर मिस्ड कॉल देऊन संकल्पपत्राच्या सूचना रेकॉर्ड करता येणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नमो ॲप’वरूनही सूचना पाठवता येतील, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.