

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : महावितरणने राज्यातील उमेदवारांना नोकर भरतीत डावलण्याचा घाट घातल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. अभियंता वितरण आणि अभियंता स्थापत्य ही पदे भरण्यासाठी नुकतीच जाहिरात काढली आहे. १ मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील उमेदवारांना संधी मिळावी, म्हणून उमेदवार हा मराहाष्ट्राचा रहिवासी असावा (डोमिसाईल) अशी कोणतीही अट टाकलेली नाही. त्यामुळे परराज्यातील उमेदवारांची येथे मोठ्या प्रमाणात घुसखोरी होण्याची शक्यता असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राज्य सरकारच्या वेगवेगळ्या अस्थापनांत अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती करताना उमेदवार हा पंधरा वर्षांपासूनचा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अशी अट आहे. त्यानुसार अर्ज भरतानाही दाखला सादर करावा लागतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या माध्यमातूनही भरल्या जाणाऱ्या पदांसाठी ही अट लागू आहे. महावितरणने नोकर भरतीसाठी अर्ज मागवलेले अभियंता हे पद द्वितीय श्रेणीचे असल्याचे स्पष्ट करून रहिवासी दाखल्याबाबतची अट टाकलेली नाही. त्यामुळे ४९ जागा असलेल्या दोन्ही पदांसाठी देशातील कोणत्याही राज्याचा उमेदवार अर्ज करू शकणार आहे.
------
‘गेट’ची आडकाठी
अभियंता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ग्रॅज्युएट अप्टीट्युड टेस्ट इन इंजिनीअरिंग (गेट) परीक्षेत मिळालेल्या मार्कसाठी १० टक्के गुण ठेवले आहेत. गेट परीक्षा कठीण आणि खर्चिक आहे. त्यामुळे यात महाराष्ट्रातील किती उमेदवार टिकणार, हा प्रश्न आहे.
------
महावितरणकडून वर्ग एक आणि दोन या गटांतील पदांच्या भरतीसाठी सुरुवातीपासूनच रहिवासी दाखल्याची अट नाही. कंपनीला जास्तीत जास्त चांगले उमेदवार मिळावेत, हा या मागचा हेतू आहे.
- अरविंद भादीकर, संचालक (मनुष्यबळ), महावितरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.