

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सध्या बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. मुंबई पोलिसांकडून जारी केलेल्या शस्त्र परवान्याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच इतर राज्यातून जारी केलेल्या शस्त्रास्त्रांची फेरनोंदणी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वैयक्तिक संरक्षणासाठी शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्ती आणि सुरक्षा सेवांत असलेल्या व्यक्तींच्या परवान्याची पडताळणी करण्यासाठी अतिरिक्त निर्देश देण्यात आलेले आहेत. दहा दिवसांत गुन्हे शाखेच्या युनिट्सने अनधिकृत शस्त्रे बाळगल्याच्या प्रकरणी केलेल्या कारवाईत तीन आरोपींना अटक केली आहे.
घाटकोपरमधून जमरूल हनीफ खान आणि मोहम्मद यासर मोहम्मद इक्बाल यांना पिस्तूल बाळगल्याबद्दल अटक केली आहे.
-------
परवान्याची पडताळणी
बांधकाम व्यावसायिक, राजकारणी इत्यादींच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेले सुरक्षा कर्मचारी आणि खासगी अंगरक्षक सध्या छाननीत आहेत, त्यांच्या शस्त्र परवान्यांची कसून पडताळणी केली जात आहे. इतर राज्यांचे परवाने असून मुंबईत त्यांच्या शस्त्रांचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी त्यांचे परवाने हस्तांतरित करणे. तसेच शहर पोलिसांना संबंधित शस्त्रांचे दस्तऐवज सादर करणे पोलिसांनी आवश्यक केले आहे. शस्त्राबाबत पुरेसा तपशील किंवा कागदपत्रे प्रदान करण्यात अयशस्वी झाल्यास शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत शुल्क आकारले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.