टीशर्ट ठरले मारेकऱ्यांचा काळ

टीशर्ट ठरले मारेकऱ्यांचा काळ
Published on

नेरळ, ता. ३ (बातमीदार)ः कर्जत-मुरबाड रस्त्यावरील नालधे गावाजवळ एका तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मृतदेहाच्या पायाला बांधलेला टी-शर्ट हा पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरला होता. त्यामुळे दोनच दिवसांत हत्येचा उलगडा करण्यात नेरळ, कर्जत पोलिसांसह रायगड गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील नालधे गावाच्या हद्दीत असलेल्या अबासा फार्म हाऊसजवळ गुरुवारी (ता. २९) सायंकाळी एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. हात-पाय बांधलेल्या तसेच गळा चिरलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले होते. या वेळी कर्जत पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देत तपासाला सुरुवात केली. मयत तरुणाचे हात-पाय बांधण्यासाठी वापरलेल्या कपड्यावर काही खुणा दिसून आल्या होत्या. त्यावरून मयत व्यक्ती नेपाळ येथून कामानिमित्त पनवेल येथे आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे हॉटेलमध्ये केटरर्स म्हणून कामावर ठेवणारा लेबर कॉन्ट्रक्टर दिलीप धनसानी याच्यासह त्याचा सहकारी विजय वाघरी (वय ३८), रा. पनवेल यांना शनिवारी (ता. २) अटक केली आहे.
---------------------------------------------
पूर्ववैमन्यासातून हत्येची कबुली
आरोपींनी मयत तरुणाची दारू पाजून सुगवे गावाच्या पुढच्या जंगलात धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह रिक्षाने घालून एका निर्जन स्थळी फेकण्यात आला होता. या वेळी वापरण्यात आलेल्या टी- शर्टमुळे मयत व्यक्तीचे नाव सूरज असल्याचे उघड झाले होते. तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षादेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com