यशस्‍वी होण्यासाठी शॉर्टकट नको : दिलीप वेंगसरकर

यशस्‍वी होण्यासाठी शॉर्टकट नको : दिलीप वेंगसरकर
Published on

यशस्‍वी होण्यासाठी शॉर्टकट नको : दिलीप वेंगसरकर
पनवेल, ता. ३ (बातमीदार)ः कोणत्‍याही खेळात मेहनतीला पर्याय नाही, त्यामुळे शॉर्टकट घेऊ नका तरच मेहनतीचे फळ गोड मिळेल, असा सल्ला नवोदित खेळाडूंना ज्‍येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी दिला. भारतीय जनता पक्षातर्फे पूर्ण महाराष्ट्रात ‘नमो चषक’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ज्‍येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी पार पडला.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, पनवेलमधील माझी ही चौथी अॅकॅडमी आहे. यापूर्वीच्या अॅकॅडमीतून दर्जेदार क्रिकेटपटू तयार होऊन आयपीएल तसेच इतर स्पर्धेमध्ये खेळत आहेत. त्याचप्रमाणे पनवेलच्या अॅकॅडमीतही खेळाडूंना प्रशिक्षित प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येईल आणि ते सुद्धा विनामूल्य. यावेळी त्यांनी ‘नमो चषक’ स्पर्धेच्या भव्य आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करताना एका स्पर्धेत एक लाखाहून अधिक स्पर्धक सहभाग घेतात हे माझ्या ऐकिवातही नाही, असे सांगतानाच अप्रतिम असा हा महोत्सव झाला असल्याची पोचपावती त्यांनी आयोजकांना दिली. पुढे बोलताना त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आवर्जून उल्लेख करत त्यांना मी जवळून ओळखतो. त्यांचे कार्य खूप मोठे आहे आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर हे समाजहिताचे काम करत आहेत, असेही दिलीप वेंगसरकर यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते सी. सी. भगत, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अरुणकुमार भगत, यांच्यासह पदाधिकारी, खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com