राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय

राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय

ठाणे जिल्ह्यातून रबालेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय प्रथम क्रमांकावर
वाशी, ता. १० (बातमीदार) ः नवी मुंबई महानगरपालिका संचालित रबाले आंबेडकर नगर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाने महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका व तालुक्यातील शेकडो शाळांमध्ये पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने प्रथम क्रमांक पटकावत आणखी एक मानचा तुरा शिरपेचात खोवला आहे.
राजर्षी शाहू महाराज विद्यालय हे फक्त ज्ञानाचे केंद्र नसून संस्कारांचे बाळकडू पाजत उत्तम नागरिक घडवण्यासाठी येथे असणारा प्रत्येक घटक धडपडत असतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यावर भर असतो. या सर्वांगीण विकासाचा मुख्य गाभा असणारे माजी महापौर सुधाकर सोनवणे क्रीडा, शैक्षणिक, वैज्ञानिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील व्यासपीठावरून आपल्या विद्यार्थ्यांना यश गाठण्यासाठी शिडी उपलब्ध करून देत असतात. त्यामुळेच राजर्षी शाहू महाराज विद्यालय राष्ट्रीय स्वच्छ पुरस्कार विजेता, क्रीडा क्षेत्रातील भरत पुरस्कार, वीर अभिमन्यू पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रयोग यात सहभागी होऊन त्यात प्रावीण्य प्राप्त केले आहे. त्यातूनच प्रेरणा घेत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमात शाहू विद्यालय सहभागी झाले. या उपक्रमातील गुणदानासाठीचे जे मुद्दे होते, ते सर्वच उपक्रम आपण आधीपासूनच राबवत होतो. पालिकेच्या शिक्षणाधिकारी अरुणा यादव नेहमीच विविध उपक्रम राबवण्याबाबत सजग राहत सर्व शाळांनी सहभागी होण्यावर त्यांचा भर असतो आणि त्यामुळेच गुणदानासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची मुद्द्यानुसार एकसंधता केली. तर माहितीचे उत्तम पद्धतीने एकत्रीकरण करत असताना इतर आपल्या सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या स्तरावर घेतलेल्या उपक्रमांचे फोटो, माहिती संकलन करण्यात त्यांना सहकार्य केले. या वर्षी आपण जिल्ह्यात प्रथम आलो, पुढील वर्षी सुधाकर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजर्षी शाहू महाराज विद्यालयाला राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त असेल, असा विश्वास शाळेचे समन्वयक कमलेश इंगळे यांनी व्यक्त केला; तर मिळालेल्या यशासाठी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कुडूसकर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, विस्तार अधिकारी कल्पना गोसावी, सुलभा बारघरे, केंद्र समन्वयक रमेश तेली, मुख्याध्यापक अमोल खरसांबळे, मुख्याध्यापिका रंजना वनशा, शाळाप्रमुख स्नेहल विशे, सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com