थोडक्‍यात रायगड

थोडक्‍यात रायगड

थोडक्‍यात रायगड
महात्मा गांधी ग्रंथालयात जागतिक महिला दिन साजरा
पेण बातमीदार ः येथील महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालयाच्‍या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त नोकरी करणाऱ्या महिलांकडे जाऊन त्यांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्‍या. वाचनालयाच्या कार्यवाह मोहिनी गोरे यांच्या हस्ते पेण पोलिस ठाणे, तहसील कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, महाराष्ट्र राज्‍य विद्युत मंडळ, अरुण कुमार वैद्य शासकीय रुग्णालय येथील महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. अशा प्रकारे एक आगळावेगळा कार्यक्रम जागतिक महिला दिनानिमित्त वाचनालयामार्फत साजरा राबवण्यात आला.
..................
वडखळ येथे महिला दिन साजरा
पेण (बातमीदार) ः गणेश मंदिराच्या अभ्यासिका हॉलमध्ये क्षितिज फाऊंडेशन मल्टिपर्पज व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते संदेश गायकवाड यांना व्याख्याते म्हणून आमंत्रित केले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून क्षितिज मल्टिपर्पज असोसिएशन फाऊंडेशनच्या अध्यक्षा शीतल माळी उपस्थित होत्या. या वेळी महिलांना मार्गदर्शन करताना संदेश गायकवाड म्हणाले, बु‌वा-बाबा, मांत्रिकाच्या नादाला लागू नका. त्‍यांना दानधर्म करण्यापेक्षा गरिबांना मदत करा. भुकेल्याला अन्य द्या. त्यांच्‍या शिक्षणाचा खर्च उचला. देव त्यांच्यात सापडेल, बुवा-बाबा शोषण करतात. प्रत्येक महिलेने त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सदस्या मीना मोरे यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली. एन. जे. पाटील यांनी अंधश्रद्धेवरील कविता वाचून दाखवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीतल माळी यांनी केले. समारोप व आभार वर्षा पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाला वडखळचे रमेश पाटील, क्षितिज मल्टिपर्पज असोसिएशन फाऊंडेशनच्या अध्यक्षा आशा पाटील, उपाध्यक्ष ज्योती गावंड, शालिनी पाटील व मोठ्या संख्येने महिला उपस्‍थित होत्या.
.................
रसायनीत सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम
रसायनी (बातमीदार) : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड कंपनीतील कामगारांसाठी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कामगारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी सी. ई. ओ. राकेश गोयल, फॅक्टरी मॅनेजर नागनाथ खटकाळे, एच. आर. मॅनेजर मॅथ्यू डिकुन्हा उपस्थित होते; तर सुरक्षा अधिकारी प्रदीप रकटे यांनी सर्व कामगारांना सुरक्षेची शपथ दिली आणि सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. मेकॅनिकल हेड संजय अकोले तसेच साईट एच. आर. अर्चना माने यांनी सर्व कामगारांसाठी विविध उपक्रम आयोजित केले होते. या वेळी सुरक्षा सप्ताहादरम्यान हायड्रंट वेट ड्रिल, मेमरी, क्विझ, वक्तृत्व, पोस्टर अशा विविध स्पर्धांचा समावेश होता.
............
पोयनाडमध्ये घुमला हर हर महादेवाचा गजर
पोयनाड (बातमीदार) ः अलिबाग तालुक्यातील पोयनाड परिसरात उत्साहात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. विविध मंदिरांमधून हर हर महादेव आणि ओम नमःशिवायचा गजर दिवसभर ऐकू येत होता. दिवलांग येथील ओंकारेश्वर मंदिर, आठवडा बाजारसमोरील चंद्रमोळेश्वर मंदिर, जमनानगर येथील पिंपळेश्वर मंदिर, कमळपाडा येथील शंकर मंदिर यासह विविध गावांतील महादेवाच्‍या मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दिवसभर शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन, भजन, हरिपाठ यासारखे कार्यक्रम; तर सायंकाळी विविध ठिकाणी पालखी सोहळा आयोजित केला होता. अनेकांनी भल्या पहाटेच कनकेश्वर आणि सिद्धेश्वर येथे जाऊन महादेवावचे दर्शन घेतले.
...............
पाटणेश्वर मंदिरात शिवभक्तांची अलोट गर्दी
पेण (वार्ताहर) : पाटणेश्वर येथील शिवकालीन मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांनी पहाटेपासूनच अलोट गर्दी केली होती. संपूर्ण देशभर महाशिवरात्री उत्सव साजरा होत असताना या वर्षीही तालुक्यात मोठ्या प्रमाणात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. या वेळी महाराष्ट्रासह रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असणाऱ्या पुरातन काळातील स्वयंभू पाटणेश्वर शिवमंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी उसळली होती. मंदिरातील शिवलिंगाला बेल, तांदूळ, दूध, हार व फुले अर्पण करून भक्तगण मनोभावे पूजाअर्चा करत होते; तर अनेक भक्तांनी या ठिकाणी तुला करून घेतली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शिवभक्त येत असल्याने येथील संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून निघाला होता. पेण तालुक्यातील वरसई वैजनाथ, वडखळ क्षेत्रेश्वर, वीश्वेश्वर, गोटेश्वर, गौतमेश्वर, व्याघ्रेश्वर, सिद्धेश्वर अशा अनेक शिवकालीन मंदिरांत महाशिवरात्र या वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली; तर या वेळी पेण प्रायव्हेट हायस्कूलच्या वतीने पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंचायत समितीचे प्रसाद म्हात्रे, प्राचार्य डी. के. बामणे, तलाठी वैशाली बावा व विद्यार्थी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com