इलेक्ट्रॉन बॉण्ड्सवरून युवक काँग्रेसचे आंदोलन

इलेक्ट्रॉन बॉण्ड्सवरून युवक काँग्रेसचे आंदोलन

इलेक्ट्रॉन बॉण्ड्सवरून युवक काँग्रेसचे आंदोलन
वाशी, ता. १० (बातमीदार) : इलेक्ट्रॉन बॉण्ड्सला सुप्रीम कोर्टाने असंवैधानिक ठरवल्यानंतरही एसबीआयने याबाबतची माहिती सादर करण्यासाठी ३० जुलैपर्यंतचा वेळ मागितला आहे. त्‍यामुळे भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नवी मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. त्याविरोधात ऐरोली येथील एसबीआय बँकेजवळ युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे उपस्थित होते.
युवक काँग्रेस लोकशाही विरोधी चाललेल्या या कृत्यांविरोधात मजबुतीने उभी आहे आणि या देशाच्या जनतेसमोर मोदी सरकारचे पितळ उघडे पाडणार आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे बिथरलेल्या भाजपने जनतेची अजून फसवणूक न करता, आतातरी खरे बोलावे, अशी टीका यावेळी सर्वच नेत्यांनी केली.
आंदोलनावेळी एसबीआयचा प्रतीकात्मक पुतळा बनून त्याला आर.एस.एस.चा पोशाख घालण्यात आला. यावेळी भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव बंटी शेळके, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदय चिंब, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश युवक काँग्रेसचे सहप्रभारी एहसान खान, रोहित कुमार, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, सोनालक्ष्मी घाग व प्रशांत ओगले, नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक, नवी मुंबईचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com