वायकर प्रवेश बातमीला जोड

वायकर प्रवेश बातमीला जोड

आमदारांनी ठाकरेंना नाकारून शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास टाकला, तेव्हाही रवींद्र वायकर यांचे तळ्यात मळ्यात सुरू होते. मात्र, ‘मातोश्री’शी संबंध दृढ ठेवत वायकर ठाकरेंसमवेत राहिले. मात्र, ९ जानेवारीला वायकरांच्या घरी ईडीचा छापा पडला. त्यानंतर वायकर यांनी मी जमीन विकत घेतली; पण आयकर भरला, असे सांगत पंचतारांकित हॉटेलसंबंधीचे आरोप फेटाळून लावले.
काल ता. ९ रोजी उद्धव ठाकरे अंधेरी परिसरात गेले तेव्हा वायकर त्यांना भेटायला गेले, असे नव्हे तर ते सभेलाही हजर राहिले. आज केवळ चोवीस तासांनी ते शिंदेंच्या गटात सामील झाले.

भाजपची भूमिका काय?
वायकर यांच्यावर भाजपने सातत्याने आरोप केले होते. आता त्यांनी शिंदेगटात प्रवेश घेतल्याने भाजप पुढे काय करणार, असा प्रश्न केला जात आहे. राहुल शेवाळे, यशवंत जाधव यांच्यापाठोपाठ वायकर या मुंबईच्या महापालिकेच्या माजी स्थायी समितीच्या अध्यक्षांनी शिंदे गट जवळ केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com