मुलुंडमध्ये ‘आपला दवाखाना’चे भूमिपूजन

मुलुंडमध्ये ‘आपला दवाखाना’चे भूमिपूजन

मुलुंडमध्ये ‘आपला दवाखाना’चे भूमिपूजन
मुलुंड, ता. १२ (बातमीदार) ः भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या प्रयत्नाने आणि मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने म्हाडा कॉलनी आनंद नगर पत्रा चाळ मुलुंड पूर्व येथे ‘आपला दवाखाना’ उभारण्यात येत आहे. या दवाखान्याचे भूमिपूजन मंगळवारी (ता. १२) खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते आणि टी विभागाचे सहायक आयुक्त अजय पाटणे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
यामुळे मुलुंडमधील सामान्य आणि गोरगरीब नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. विशेष म्हणजे मुलुंड परिसरमधील हा पहिला दवाखाना आहे. या भागातील नागरिकांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी सावरकर सर्वसाधारण रुग्णालयामध्ये जावे लागते. रुग्णांना रिक्षाने प्रवास करीत रुग्‍णालय गाठावे लागते. रुग्‍णांचा वेळ आणि पैसाही खर्च होतो. ही बाब ओळखून प्रभाकर शिंदे यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला. या प्रसंगी ‘मी मुलुंडकर प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या मयूरा बाणावली, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com