Thane: अनधिकृत वीज जोडणीमुळे  तरुणाचा मृत्यू; टपरी चालकावर गुन्हा

Thane: अनधिकृत वीज जोडणीमुळे तरुणाचा मृत्यू; टपरी चालकावर गुन्हा

Bhivandi News: तालुक्यातील वेहळे गावात विजेचा धक्का लागल्याने मजुराच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येल्लपा ऊर्फ पिंटू संजय वल्लेवार (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Thane: अनधिकृत वीज जोडणीमुळे  तरुणाचा मृत्यू; टपरी चालकावर गुन्हा
Pune Crime : बॉम्बच्या साहित्यासाठी साताऱ्यात व्यापाऱ्याला लुटले; ‘एटीएस’ची माहिती

या घटनेने वेहळे परिसरातून हळहळ व्यक्त केली गेली. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तर तब्बल चार महिन्यांच्या तपासाअंती या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वडापाव चालकाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संजय यल्लपा वल्लेवार (५०) हे वेहळे गावातील रामजीनगरमधील मायबाप चाळीसमोरील एका खोलीत राहत आहेत. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री साडेआठ वाजता संजय यांचा मुलगा येल्लपा हा घराच्या बाजूकडील बाथरूममध्ये जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी बाथरूमजवळील लोखंडी शिडीचा त्याला शॉक लागला.

Thane: अनधिकृत वीज जोडणीमुळे  तरुणाचा मृत्यू; टपरी चालकावर गुन्हा
Crime News: अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी दोघांना अटक

त्यानंतर त्यास उपचारासाठी मानकोली येथील लोटस रुग्णालयात दाखल केले होते; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर या मृत्यूप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला होता.

दरम्यान, चौकशीअंती वडापाव टपरीचालक बंडू परशुराम पाटील (५५) याने संजय वल्लेवार हे राहत असलेल्या चाळीतून अनधिकृतपणे लावलेल्या मिनी मीटरमधून वीज जोडणी घेतल्याने येल्लपा उर्फ पिंटूला विजेचा शॉक लागल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे १२ मार्च रोजी नारपोली पोलिसांनी वडापाव दुकानचालक बंडूच्या विरोधात ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश वडणे करीत आहेत.

Thane: अनधिकृत वीज जोडणीमुळे  तरुणाचा मृत्यू; टपरी चालकावर गुन्हा
Nagpur Crime News : घरात आढळले तिघांचे मृतदेह, निमखेडा जवळील घटना; उत्तरीय तपासणीनंतर रहस्य उलगडणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com