Holi News: होळी, धुलिवंदनसाठी बाजारपेठा सजल्या; विविध रंगांसह अनोख्या पिचकाऱ्या दाखल

यंदा काही वस्‍तूंचे भाव वधारले असले तरी मोठ्या प्रमाणावर होळीच्‍या साहित्‍याची खरेदी केली जात आहे.
holi news
holi news sakal
Published on

Uran News: दोन दिवसांवर होळी सण येऊन ठेपला असून उरण येथील बाजारामध्ये विविध प्रकारच्या रंगांनी तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे.

तर खरेदीसाठी नागरिकांमध्येदेखील उत्‍साह दिसून येत आहे. यंदा काही वस्‍तूंचे भाव वधारले असले तरी मोठ्या प्रमाणावर होळीच्‍या साहित्‍याची खरेदी केली जात आहे.

holi news
Uran News: न्याय हक्कांसाठी उरणमध्ये शेतकऱ्यांची आक्रमक; हिंद टर्मिनलवर दिली धडक

उरण तालुक्यात दोन ते अडीच लाख लोकसंख्या आहे. शहरासह तालुक्‍यात होळी सण मोठ्या उत्‍साहात साजरा केला जातो. येथील आगरी, कोळी, कराडी समाजाकडून हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. त्‍यानुसार शहरातील बाजारपेठांमध्ये अनेक ठिकाणी विविध रंग व पिचकाऱ्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

holi news
Uran News : सतीश गावंडचे एजंट सुसाट; लोकांचे पैसे न देता देताहेत सार्वजनिक कार्यक्रमात सतीश गावंडेच्या नावे देणग्या

पिचकाऱ्यांमध्ये यंदाही टॅंक, पंप, कार्टून, प्रोजन, डोरेमोन, मिकी माऊस, स्पायडर मॅन आदी विक्रीस उपलब्ध आहेत. बच्चेकंपनीकडून शक्‍यतो कार्टून पिचकारी विकत घेण्याचा कल दिसून येत आहे; तर यंदा नैसर्गिक रंग विकत घेतले जात आहेत.

त्‍यांची मागणी वाढल्‍यामुळे दरातदेखील वाढ झाली आहे. तसेच विविध प्रकारचे कलर केलेले टी-शर्टही विक्रीसाठी आले आहेत. होळीच्या खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बाजारपेठेत उत्साह आहे.

holi news
Uran News : उरण एसटी आगारात सुरक्षितता अभियान २०२४ चे शुभारंभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com