Uran News : सतीश गावंडचे एजंट सुसाट; लोकांचे पैसे न देता देताहेत सार्वजनिक कार्यक्रमात सतीश गावंडेच्या नावे देणग्या

उरण, पनवेल सह इतर तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांनी पिरकोन गावातील सतीश गावंड व कोप्रोली गावातील सुप्रिया पाटील यांनी गोरगरीब नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
chitfund
chitfundesakal

उरण - उरण पूर्व विभाग चिटफंड घोटाळा प्रकरणी उरण, पनवेल सह इतर तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांनी पिरकोन गावातील सतीश गावंड व कोप्रोली गावातील सुप्रिया पाटील यांनी गोरगरीब नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.

अशा गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतीश गावंड, सुप्रिया पाटील, व तसेच एजंट यांच्या विरोधात रविवारी (दि. २४) खोपटे गावातील आगरी पार्क मैदान येथे आयोजन केले. यावेळी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांमध्ये एकच उद्रेक निर्माण होत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

उरण परिसरात चिटफंड योजनेत झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी हजारोंच्या संख्येने भोळ्याभाबड्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे हे पिरकोन गावातील सतिश गावंड व कोप्रोली गावातील सुप्रिया पाटील यांच्याकडे एंजटच्या मदतीने गुंतवले आहेत. त्यामध्ये गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली असून, हे प्रकरण हे पोलीस यंत्रणेकडून न्याय प्रविष्ट झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हे सध्या हैराण झाले आहेत.

या गुंतवणूकदारांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने पैसे मिळवून देण्यासाठी सारडे गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिंदे गटातील पदाधिकारी रुपेश पाटील यांनी गुंतवणूकदारांना आवाहन केले होते. तसेच हा विषय विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात देखील गाजला होता.

या आकोश मोर्चात आर्थिक फसवणूक झालेल्या आणि सैरभैर झालेल्या गुंतवणूकदारांचा उद्रेक निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. जनसंघर्ष समिती उरण यांच्या माध्यमातून जनसामन्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यात आला. या आक्रोश मोर्चात आमचा पैसा कुठे गेला? शोधत का नाही?आरोपी सांगत का नाही? अशा प्रश्नांची उत्तरं विचारत आक्रोश करण्यात आला.

तसेच आमच्या हक्काचे घामाचे पैसे फसवुन व लुबाडुन घेतले तरीही याबाबत आम्ही किती शांत बसायचं? असाही प्रश्न गुंतवणूकदारांनी विचारला. तसेच या गुंतवणूकदारांनी सतीश व सुप्रिया तसेच एजंट यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com