mumbai local crime
mumbai local crimesakal

Mumbai Local Crime: धावत्या लोकलमध्ये दहा वर्षीय मुलीची छेड

Mumbai Local News: आंबिवली ते टिटवाळा स्थानकादरम्यान हा प्रकार घडला होता.

Mumbai Local Crime: रेल्वेतून प्रवास करणाऱ्या दहा वर्षीय मुलीची छेड काढणाऱ्या युवकाला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आंबिवली ते टिटवाळा स्थानकादरम्यान हा प्रकार घडला होता. (mumbai local news )

mumbai local crime
Mumbai Local News: मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक; जाणून घ्या संपुर्ण माहिती

६५ वर्षीय ज्येष्ठासह त्याची दहा वर्षांच्या नातीचा गुरुवारी दुपारी रेल्वेने प्रवास करताना एका तरुणाने हात पकडून अश्लील हावभाव केले होते. हा प्रकार मुलीसोबत असलेल्या व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क करत घटनेची माहिती दिली.

त्यानुसार टिटवाळा स्थानकात लोकल आल्यानंतर रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी विशाल सिंग नामक युवकाला ताब्यात घेतले आहे. तसेच मोबाईल चोरीच्या प्रकारांत त्याचा सहभाग असल्याची माहिती चौकशीनंतर समोर आली आहे.(mumbai local news )

mumbai local crime
Mumbai Local News: लोकलमधील फुकट्यांवर 'बॅटमॅन'चा वॉच; आतापर्यंत तब्बल इतक्या हजार प्रवाशांवर केली कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com