Railway
RailwaySakal

Summer Holiday Train: उन्हाळी सुट्टी निमित्त रेल्वे चालवणार २६ जादा फेऱ्या

उन्हाळी सुटीत गावी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते कानपूर

Railway News: उन्हाळी सुटीत गावी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते कानपूर दरम्यान धावणाऱ्या अतिजलद साप्ताहिक विशेष ट्रेनच्या २६ जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते कानपूर जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.(mumbai news)

Railway
Konkan Railway : कोकण रेल्वेवरील वाढीव गाड्या, थांबे मागण्यांना ब्रेक; वीर ते मंगळुरू दुहेरीकरण योजनाही कागदावरच!

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०४१५२ एलटीटी-कानपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६ एप्रिल २०२४ ते २९ जून २०२४ या कालावधीत दर शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४५ वाजता कानपूर सेंट्रल येथे पोहोचेल.(holiday special trains)

Railway
Railway News: दोन अनारक्षित होळी विशेष ट्रेन!

तर ट्रेन क्रमांक ०४१५१ अतिजलद साप्ताहिक विशेष ट्रेन ५ मार्च २०२४ ते २८ जून २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी कानपूर सेंट्रल येथून दुपारी ३.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोचेल.

या विशेष गाड्यांना भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज, भरवारी, सिराथू आणि फतेहपूर स्थानकांत थांबा असणार आहे. या अतिजलद साप्ताहिक विशेष ट्रेनचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे.(summer speticial trains)

Railway
Railway News: यंदा होळीसाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्या झाल्या रद्द!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com