Mumbai News: विरार-अलिबाग महामार्ग फास्ट ट्रॅकवर; विकासाला मिळणार गती

Mumbai News| पहिल्या टप्प्यात ९६ किलोमीटरचा महामार्ग बनवण्यात येणार आहे | In the first phase, 96 km highway will be constructed
Virar-Alibag Highway
Virar-Alibag Highwaysakal
Published on: 


Mumbai News: मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह परिसरातील विकासाला चालना देणारा विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर महामार्गाचे काम फास्ट ट्रॅकवर आहे. पहिल्या टप्प्यात ९६ किलोमीटरचा महामार्ग बनवण्यात येणार आहे.

Virar-Alibag Highway
Mumbai News: तोट्यात असलेल्या ‘मोनो’ला येणार चांगले दिवस? प्रवासी क्षमता वाढणार

या कामासाठी निवड केलेल्या नऊ कंपन्यांना त्यांची मूळ कागदपत्रे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) मंगळवारपर्यंत सादर करावयाची आहेत.


विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरची एकूण लांबी १२६ किलोमीटर आहे. पहिल्या टप्प्यात नवघर (विरार) ते बलवली (पेण) दरम्यान ९६ किलोमीटरचा सुविधांनी परिपूर्ण असा मार्ग बांधला जाणार आहे.

Virar-Alibag Highway
Mumbai North-East Lok Sabha 2024: ईशान्य मुंबईत महायुती, आघाडी थेट लढत; मनोज कोटक यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता

या महामार्गाचे काम अकरा टप्प्यांमध्ये केले जाणार असून निवड झालेल्या कंपन्यांच्या पात्रता कागदपत्रांची तपासणी मंगळवारी (ता. २) होणार आहे. या महामार्गाच्या उभारणीवर १९ हजार ३३४ कोटींचा खर्च केला जाणार असून महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे म्हणून एका कंपनीला जास्तीत जास्त दोन पॅकेजचे काम दिले जाणार आहे.



केंद्राकडे परवानगीसाठी अर्ज


पर्यावरण, वन्यजीव आणि सीआरझेड या तीन प्रमुख विभागांची परवानगी बंधनकारक आहे. त्यानुसार एमएसआरडीसीने पर्यावरण विभागाच्या परवानगीसाठी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे अर्ज केला आहे. डिसेंबर २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

Virar-Alibag Highway
Mumbai South Central Lok sabha : राहुल शेवाळेंची घोडदौड अनिल देसाई रोखणार का? काँग्रेसची मते ठरणार किंगमेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kagal Peth Naka Highway
Mumbai-Goa Highway Delayed for 17 Years with 5,500 Crore Cost Overrun
Topcha Six Lane Flyover Stuck in Contractor Dispute New Tender Process May Delay the Highway Project Further
Chiplun Flyover Latest Update
Marathi News Esakal
www.esakal.com