vande bharat
vande bharat esakal

Kokan News: मुंबई-गोवा वंदे भारत हाऊसफुल्ल; उन्हाळ्याच्या सुटीत डबे वाढवण्याची मागणी


Vande Bharat News: उन्हाळ्याच्या सुटीत गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. मुंबई ते गोवादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे पुढील दोन महिन्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले असून प्रतीक्षायादी सुरू झाली आहे. त्यामुळे आठ डब्यांऐवजी सोळा डब्यांची ‘वंदे भारत’ सोडण्याची मागणी प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे.

vande bharat
Kokan News: बिबट्याच्या दहशतीने नाणोसवासीय त्रस्त; वनविभागाचे वेधले लक्ष

उन्हाळी सुटी आणि लग्नसराई असल्यामुळे गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वेकडून दरवर्षी उन्हाळी विशेष गाड्याही चालविण्यात येतात. यंदाही मध्य रेल्वेने प्रवाशांनी उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे.

तसेच मुंबई ते मडगावदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे पुढील दोन महिन्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून प्रतीक्षा यादी सुरू झाली आहे. ट्रेन क्रमांक २२२२९ मुंबई- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या २५ मे २०२४ पर्यंत तर २२२३० मडगाव- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या काही दिवसांचा अपवाद वगळता ३ जून २०२४पर्यंतच्या फेऱ्या प्रतीक्षायादीत गेल्या आहेत. त्यामुळे मुंबई- मडगाव वंदे भारत ट्रेनच्या डब्यांची संख्या १६ करण्याची मागणी प्रवासीवर्गाकडून करण्यात येत आहे.

vande bharat
Kokan News: ''संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी भाजपला सत्तेतून हटवले पाहिजे''

कोकण रेल्वे मार्गाचा वापर क्षमतेच्या १६८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे या मार्गावर चालणारी प्रत्येक गाडी पूर्ण क्षमतेने चालायला हवी. म्हणूनच लवकरात लवकर ही गाडी १६ डब्यांची करायला हवी. त्यामुळे गाडीची एकूण क्षमता वाढेलच;

परंतु मुंबईकडे येताना रत्नागिरी आणि खेडसाठीचा आरक्षण कोटाही वाढेल. त्याचा फायदा संबंधित स्थानकांच्या व रेल्वेच्या एकूण उत्पन्नवाढीसाठी होईल. विशेषतः खेडला या वाढीव उत्पन्नाचा फायदा होऊन आणखी सुपरफास्ट गाड्यांचे थांबे मिळण्यास मदत होईल. तसेच प्रतीक्षायादीही कमी होईल.


- अक्षय महापदी, सदस्य, कोकण विकास समिती

vande bharat
Kokan Weather: कोकणावर पावसाचे सावट कायम; आजही पाऊस पडण्याचा अंदाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com