ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणारे दोघे गजाआड

ज्येष्ठ नागरिकांना लुबाडणारे दोघे गजाआड

नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : एटीएमद्वारे पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांजवळच्या एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदल करून त्यांच्या बँक खात्यातून एटीएमद्वारे पैसे काढणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने अटक केली आहे. सय्यद कमलुद्दिन खान (३४) व मोहम्मद शाबान ईलियास खान (४४) अशी या दोघांची नावे असून त्यांनी नवी मुंबई, ठाणे परिसरात अशाच प्रकारचे केलेले सात गुन्हे उघडकीस आले आहेत. या दोघांकडून पोलिसांनी ८० हजाराची रोख रक्कम व या गुन्ह्यांसाठी वापरलेली कार जप्त केली आहे.
२१ मार्च रोजी कामोठे हद्दीमध्ये एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी एक ज्येष्ठ नागरिक गेले होते. त्या वेळी एका व्यक्तीने पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ असलेले एटीएम कार्ड व पिन नंबर घेऊन हातचलाखीने त्यांना दुसरे एटीएम कार्ड देऊन पलायन केले होते. त्यानंतर लुटारूने त्यांच्या खात्यातून एक लाख रुपये काढून घेतले. याबाबत कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कामोठे पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट-२ कडून या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात येत होता.

-------------
कारच्या नंबरवरून तपास
गुन्हे शाखेने सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींच्या घटनास्थळी येण्या-जाण्याच्या मार्गाचा शोध घेतला. या वेळी घटनास्थळी एकच कार वारंवार येत-जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी कारच्या नंबरवरून सय्यद कमलुद्दिन खान व मोहम्मद शाबान ईलियास खान या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी कामोठे, खारघर, खांदेश्‍वर, कळंबोली, कापुरबावडी, वासिंद आणि कळवा या हद्दीत एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक केल्याचे कबूल केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com