शासकीय लाभार्थीचे रस्त्यावर अतिक्रमण

शासकीय लाभार्थीचे रस्त्यावर अतिक्रमण

बोर्डी, ता. ४ (बातमीदार) : सरकारच्या घरकुल योजनेतून मंजूर झालेल्या लाभार्थीने काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यालगतच अतिक्रमण करून घर बांधण्याचा घाट घातला आहे. संबंधित घरमालकावर कारवाई करून तातडीने काम थांबविण्यात यावे, अशी मागणी झाई बोरीगाव ग्रुप ग्रामपंचायतीतील पाटील पाडा येथील १०० ग्रामस्थांनी केली आहे.

झाई ते तलासरी या मुख्य रस्त्यावरील पाटील पाडा लोकवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका लाभार्थीला शासकीय योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे. त्याने काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावरच खड्डे खोदून काँक्रीटचे बांधकाम करण्यास सुरू केले आहे. याविरोधात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात सुमारे १०० ग्रामस्थांच्या सह्यांचा तक्रारी अर्ज दाखल केला आहे. याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असतानाही ग्रामपंचायतीने सदर अतिक्रमणकर्त्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रस्त्याच्या दोन्हीकडे पुरेशी जागा सोडूनच घराचे बांधकाम करावे, असे आदेश द्यावेत, अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. उपसरपंच प्रकाश पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर जात लाभार्थ्याला समज दिली असली असता त्याने ग्रामपंचायतीच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली आहे, असे तक्रारदार संतोष चुरी यांनी सांगितले.

संबंधित घरकुल मालकाला घरकुल योजनेतून घर मंजूर झाले आहे. त्याने केलेल्या अतिक्रमणाबाबत ग्रामस्थांच्या आलेल्या अर्जावरून त्याला दोन वेळा लेखी सूचना देण्यात आल्या; परंतु ग्रामपंचायतीच्या आदेशाला न जुमानता त्याने काम केल्यास घरकुल योजनेचा लाभ त्याला बंद करण्यात येईल.
- रजनीकांत दुबळा,
सरपंच, झाई-बोरीगाव ग्रुप ग्रामपंचायत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com