उत्कृष्ट शाळा स्पर्धेत सारंग प्रथम

उत्कृष्ट शाळा स्पर्धेत सारंग प्रथम

उत्कृष्ट शाळा स्पर्धेत सारंग प्रथम
रसायनी, ता. ४ (बातमीदार) : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड यांच्या सहकार्याने सी.एस.आर. फंडातून दरवर्षी ''माझी शाळा, स्वच्छ शाळा'' हा उपक्रम राबविला जातो. यंदा जिल्हा परिषद शाळांसाठी या उपक्रमात महत्त्वाच्या ७१ निकषांवर आधारित उत्कृष्ट शाळा स्पर्धेत रायगड जिल्हा परिषदेच्‍या सारंग शाळेने दोन लाख रुपयाचे प्रथम पारितोषिक पटकावले.
विशेष म्हणजे स्वतःपासून स्वच्छतेचे महत्त्व सुरू होते, या अनुषंगाने शालेय जीवनातून गिरवलेले धडे समाजात रुजायला हवेत, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन केले होते. अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेडचे सी.एच.आर.ओ. उदय घाग, सिनियर मॅनेजर एच. आर. मॅथ्यू डी कुन्हा, पाताळगंगा एच. आर. अर्चना माने आणि सी.एस.आर. कन्सल्टंट रवी ओंकार यांच्या उपस्थितीत हा पारितोषिक वितरण समारंभ सारंग शाळेत उत्साहात पार पडला. अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड यांच्या स्तुत्य उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

फोटो- सोबत जोडले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com