रोह्यात रंगणार धनगर समाजाच्‍या कबड्ड‍ी सामन्यांचा थरार

रोह्यात रंगणार धनगर समाजाच्‍या कबड्ड‍ी सामन्यांचा थरार

रोह्यात रंगणार धनगर समाजाच्‍या कबड्ड‍ी सामन्यांचा थरार
रोहा, ता. ४ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या तरुण व तरुणींनी कबड्डी खेळातून आपले कौशल्य दाखविण्यासाठी धनगर समाज कल्याणकारी संस्थेच्या वतीने रोहा, तळा, मुरुड तालुका मर्यादित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्‍या शनिवार, १३ एप्रिल रोजी रोहा बायपास रोडजवळील गाझी शेख सलाऊद्दीन दर्गा मैदानावर या स्पर्धा पार पडणार आहेत.
आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धनगर समाज कल्याणकारी संस्थेचे सदस्य मनोहर गोरे, जनार्धन ढेबे यांच्या संकल्पनेतून या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्‍पर्धा समाजातील तरुण आणि तरुणींसाठी पर्वणी ठरणार असल्‍याचे सांगण्यात येत आहे. शिवाय मुलींसाठी होणारी ही प्रथमच जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आहे. या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जास्तीत जास्त संघाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन धनगर समाज कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे यांनी केले आहे. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यासाठी उपाध्यक्ष मनोहर वरक, कार्याध्यक्ष अनंता गोरे, सदस्य मनोहर गोरे, चंद्रकांत झोरे आदी समाजबांधव मेहनत घेत आहेत. तसेच सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी चंद्रकांत शिंगाडे ९२६०२००२९३ आणि सुभाष होगडे यांना ८०८०५०४१९० या क्रमांकावर संपर्क करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com