वर्षभरात मुंबईतील १९७६ प्रकल्पांची महारेराकडे नोंदणी

वर्षभरात मुंबईतील १९७६ प्रकल्पांची महारेराकडे नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईसह महाराष्ट्रात निवासी इमारतींची संख्या झपाट्याने वाढत असून नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल ४३३२ नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. यात गेल्या आर्थिक वर्षात महारेराकडे नवीन नोंदणी क्रमांकासाठी पाच हजार ४७२ विकासकांनी अर्ज केला होता. त्यापैकी चार हजार ३३२ प्रकल्पांची नोंदणी केली असून उर्वरित एक हजार १३९ प्रकल्पांच्या प्रस्तावांची छाननी सुरू आहे. यामध्ये मुंबई विभागातील सुमारे एक हजार ९७६ प्रकल्पांचा समावेश आहे.
सर्वसामान्य नागरिकांची घर खरेदी करताना फसवणूक होऊ नये, वेळेत घराचा ताबा मिळावा म्हणून महारेराने प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार जिल्हानिहाय नोंदणीचा विचार करता पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ११७२ नवीन प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील ५९७, मुंबई उपनगर ५२८, रायगड ४५०, नागपूर ३३६, नाशिक ३१० अशी नोंदणी केली आहे. दरम्यान, मुंबई विभागात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि कोकणाचा समावेश आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात १,४१५ तर विदर्भात ४३७ प्रकल्पांची नोंदणी केली आहे.
नाशिक विभागात ३१० आणि मराठवाड्यात ११७ प्रकल्पांची नोंदणी करण्यात आली आहे.
महारेराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुण्यातील १४१३ प्रकल्पांपैकी ११७२, ठाण्यातील ७६५ पैकी ५९७, मुंबई उपनगरातील ६५५ पैकी ५२८, रायगडच्या ५४६ पैकी ४५९, नागपूरच्या ४०४ पैकी ३३६ आणि नाशिकच्या ३८१ पैकी ३१० प्रकल्पांना नोंदणी क्रमांक दिले आहेत. कल्याण-डोंबिवली, वसई-विरार क्षेत्रातील ४४६ प्रकल्पांपैकी ३३२ प्रकल्पांना नोंदणी क्रमांक देण्यात आलेले आहेत.
….
त्रिस्तरीय पातळीवर छाननी
महारेरा नोंदणी क्रमांक देताना प्रत्येक प्रकल्पाची वैधता, आर्थिक आणि तांत्रिक अशा त्रिस्तरीय पातळीवर कठोर छाननी करूनच नोंदणी क्रमांक मंजूर करते. याशिवाय कल्याण-डोंबिवली भागातील प्रकल्पांतील अनियमितेच्या पार्श्वभूमीवर शासनाने नोंदणी क्रमांक देण्यापूर्वी संबंधित नियोजन प्राधिकरणांकडून ‘बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र’ (सीसी) त्यांच्या पदनिर्देशित ई-मेलवरून महारेराच्या पदनिर्देशित ई-मेलवर पाठवणे बंधनकारक केले आहे. त्याची पूर्तता केल्यानंतरच नोंदणी क्रमांक दिला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com