घरपट्टी वसुलीमध्ये अडीच कोटींची घट

घरपट्टी वसुलीमध्ये अडीच कोटींची घट

कासा, ता. ४ (बातमीदार) : डहाणू नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या करधारकांकडून गेल्या आर्थिक वर्षाची घरपट्टी वसुली अपेक्षेपेक्षा कमी झाली. दरवर्षीप्रमाणे सुमारे नऊ कोटी १० लाखांचा कर वसूल व्हायचा, मात्र यावर्षी संगणक प्रणालीत तांत्रिक अडचण आल्याने उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. लोकांमध्ये जागृती करत या वर्षाची सुमारे ६.५० कोटींची रक्कम कर स्वरूपात जमा झाली आहे.

मागील वर्षीच्या सर्वेक्षणानुसार डहाणू नगर परिषदेत अंदाजे २२ हजार करदाते आहेत. नगर परिषद संगणक कार्य प्रणालीमध्ये तांत्रिक अडचण आल्याने काही काळ वसुलीमध्ये खंड पडला होता. कर पावत्या हाताने लिहाव्या लागत असल्याने कामात अडथळा निर्माण होत होता; परंतु यावर मात करत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष देत शहरात सर्वत्र याबाबत जाहिरात फलक लावले होते. अजूनही करवसुली चालूच आहे आणि येत्या काही दिवसांत नगर परिषद घर नोंदणीनुसार पूर्ण कर रक्कम जमा होईल, अशी अपेक्षा कर वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे.

शहरात १०० टक्के कर वसुली व्हावी, याकरिता संगणक प्रणाली तांत्रिक अडचणीविना योग्य ती उपाययोजना करत वर्षभराची पूर्ण कर रक्कम जमा होईल. पूर्ण राज्यभरात नगर परिषदांच्या कार्यालयात विविध संगणक कार्य प्रणालीद्वारे कर वसुली सुरू होती, पण त्यात अडचणी आल्या होत्या.

करदात्यांनी सहकार्य करत कर भरणा सुरू ठेवलेला आहे. काही तांत्रिक अडचणी आल्याने करदात्यांना थोडा त्रास झाला असेल, पण सहकार्य करून नगर परिषद परिसरातील नागरिकांनी कर भरणा करून सहकार्य करावे.
- वैभव आवारे,
प्रशासक तथा मुख्याधिकारी, डहाणू नगर परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com