पनवेलमध्ये पावसाळी नालेसफाईला सुरुवात

पनवेलमध्ये पावसाळी नालेसफाईला सुरुवात

पनवेलमध्ये नालेसफाईला सुरुवात
पनवेल, ता. ४ (बातमीदार) ः पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतीमध्ये पावसाळ्यापूर्वी अंतर्गत नालेसफाई करण्यात येत आहे. त्यामुळे वसाहतींमध्ये यंदा पाणी तुंबणार नसल्‍याची खबरदारी पालिकेकडून घेतली जात असल्याची माहिती उप आयुक्त वैभव विधाते यांनी दिली.
नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, खारघर, कामोठे याठिकाणी शेकडो कमी लांबीचे पावसाळी गटारे व नाले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकरता या गटारांची मान्सूनपूर्व सफाई पनवेल महापालिकेमार्फत सुरू आहे. पावसाळा सुरू होण्याच्या आधी नालेसफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने आखले आहे. त्यामुळे वसाहतींची पाणी तुंबण्यापासून सुटका होणार आहे. महापालिकेची स्थापना झाल्यापासून सिडकोने नालेसफाईकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले होते. त्यामुळे प्रत्येक वर्षी कमी पावसातही येथील सखल भागात पाणी साचत होते. त्यामुळे वसाहतीमधील जनजीवन विस्कळित होऊन रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते होते. सध्या नालेसफाईमधून दगड, माती, गाळ व कचऱ्याचे ढीग निघत आहेत. या पूर्वी सिडकोमार्फत केलेल्या सफाईमध्ये फक्त चेंबरखालचाच गाळ काढला जात होता. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी अडचण निर्माण होत होती; परंतु या वेळी दोन चेंबरमधील गाळ व मातीसुद्धा पालिकेकडून काढली जात आहे. ज्या ठिकाणी जास्त अंतरामुळे गाळ काढता येत नाही, अशा ठिकाणी नाल्याचा स्लॉब तोडून नालेसफाई केली जाणार असल्याची माहिती उपायुक्‍त वैभव विधाते यांनी दिली आहे.
.......................
पालिका आणि नागरिक जबाबदार
वसाहतीमधील नालेसफाईमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या व दारूच्या बाटल्या निघत आहेत. त्यामुळे नाल्यात प्लास्टिक टाकणारे नागरिक व प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी न करणारी पालिका हे दोघेही जबाबदार असल्‍याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com