माजी आमदार मीनाक्षी पाटील यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

माजी आमदार मीनाक्षी पाटील यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

माजी आमदार मीनाक्षी पाटील यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
उरण, ता. ४ (बातमीदार)ः उरणमध्ये समाजप्रबोधन शिक्षण संस्थेच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात स्वर्गीय आमदार मीनाक्षी पाटील यांची शोकसभा पार पडली. या वेळी त्‍यांना सर्वपक्षीयांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.
कामगार नेते संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी १९८४ मध्ये शेतकरी आंदोलनात माजी आमदार मीनाक्षी पाटील यांचे योगदान आणि त्यांना झालेली अटक; तसेच बोकडविरा गावातील त्यांच्या आठवणी सांगितल्या. मेघनाथ तांडेल यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून कामे करण्याची पद्धती कशी होती, तसेच प्रशासनावर वचक कसा ठेवायचा, याबद्दलचे त्‍यांचे किस्से सांगितले. त्यांची तळमळ व स्वभाव तसेच शेवटच्या काळातील आठवणी सांगितल्या. ज्येष्ठ नेते काका पाटील यांनी मीनाक्षी पाटील यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते, असे नमूद केले. कॉम्रेड भूषण पाटील यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंचायत समितीचे सदस्य महेश म्हात्रे यांनी केगावमध्ये पाणीसमस्या दूर करण्याचे तसेच रस्त्यांची कामे आमदार मीनाक्षी पाटील यांच्या प्रयत्‍नांमुळे झाल्याचे सांगितले. महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा यांनी डोंगरी गावातून पाणीसमस्या दूर करण्याचे काम मीनाक्षी पाटील यांनी केल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याविषयी प्रेमळ आठवणी सांगितल्या. शहर चिटणीस शेखर पाटील यांनी आमदार मीनाक्षी पाटील यांच्या कार्याचा, जीवनपटाचा आलेख व विधासभेत मांडलेल्‍या विविध प्रश्न, विकासकामांचा उल्लेख केला. तसेच उरण अलिबाग मतदारसंघात आमदार मीनाक्षी पाटील यांच्यासोबत काम करण्याचा सहभाग लाभला. स्वर्गीय प्रभाकर पाटील यांना त्यावेळी जवळून पाहण्याचादेखील योग आला, असे सांगितले. जनवादी महिला संघटनेचे अध्यक्ष हेमलता पाटील यांनी आमदार मीनाक्षीताई पाटील यांच्यासोबत निवडणूक काम केल्याचे व त्यांच्या स्वभावाबद्दल सांगितले. या वेळी कॉम्रेड मधुसूदन म्हात्रे, सत्यवान ठाकूर, ॲड. विजय पाटील, रमेश ठाकूर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी माजी सभापती नरेश घरत, उपसभापती महादेव बंडा, सहचिटणीस यशवंत ठाकूर, युवक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, रमाकांत पाटील, जीवन पाटील, नयन म्हात्रे, शहराध्यक्ष नयना पाटील, किशोर ठाकूर आदी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com