अपघातात तरुणाचा मृत्यू

अपघातात तरुणाचा मृत्यू

बोर्डी, ता. ४ (बातमीदार) : बोर्डी येथील शमीम मुंशी या तरुणाचा बुधवारी (ता. ३) गुजरात राज्यातील पलसाना येथील अपघातात मृत्यू झाला. ते टुरिस्टचा व्यवसाय करत असत. बोर्डी येथील काही पर्यटकांना घेऊन गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे ते गेले होते. रात्रीच्या वेळी परतत असताना पळसाना येथे टायर पंक्चर झाल्यामुळे गाडी थांबून तो बदलत असताना अचानक भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांना जोरदार टक्कर दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com